शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच सरपंच एकवटले

By admin | Updated: October 24, 2015 00:41 IST

दापोली : घरपट्टी वसुली स्थगितीविरोधात एल्गार

दापोली : उच्च न्यायालयात दाखल झालेल्या घरपट्टी आकारणी पध्दतीच्या जनहित याचिकेमुळे घरपट्टी वसुली स्थगित असल्याने ग्रामपंचायतींना कारभार हाकताना अनंत समस्या भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर जालगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मेगा चर्चा घडवून आणली. शिवाय ग्रामपंचायतींवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी पालकमंत्र्यांसह सर्व यंत्रणांना निवेदन सादर करून पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.भांडवली मूल्यांकन अथवा चौरस फुटावर घरपट्टीची आकारणी करावी, याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयाने राज्यात सर्व ग्रामपंचायतींना घरपट्टी वसुलीस स्थगिती दिली आहे. एप्रिल २०१५पासून आजतागायत घरपट्टी वसुलीचे काम स्थगित आहे. यामुळे सर्वच ग्रामपंचायतींची विकासकामे रखडली असून, नागरिकांना सुविधा देताना अडथळे येत आहेत. ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचा पगारही अनेक ग्रामपंचायतींना देणे शक्य नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. घरपट्टी वसुलीला स्थगिती दिल्याने ग्रामपंचायतीचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.ग्रामपंचायतींकडून यापूर्वी ग्रामविकास विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या याचिकेमुळे शासन लक्ष देत नसल्याने अवस्था बिकट झाली आहे. यामुळे तालुक्यातील सर्व सरपंचांना एकत्रित करून त्यांचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. हे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांसह सर्वांना निवेदन देऊन ग्रामपंचायतींच्या अडचणी मांडणार आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची विकासकामे घरपट्टी वसुलीअभावी खोळंबली आहेत. जनतेची ही व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम तालुक्यातील सरपंचांचे शिष्टमंडळ प्रभावीपणे करणार आहे. या चर्चेत अनेक सरपंच व उपसमित्यांच्या अध्यक्षांनी सहभाग घेतला. या चर्चेत जालगाव ग्रामपंचायत सदस्य विलास जालगावकर, शिवाजी लिंंगावळे यांनी ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. त्याचप्रमाणे उपस्थित सरपंचांनीही आपल्याला येणाऱ्या अडचणी कथन केल्या. सभागृहात या चर्चेत जालगाव सरपंच रश्मी जालगावकर, उपसरपंच रमेश पाटेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक जालगावकर, स्वच्छता समिती अध्यक्ष विनोद आवळे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)