शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मेफेड्रोन बंदी मोडणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: July 15, 2015 00:18 IST

जिल्हा पोलिसांकडून कडक इशारा, माहिती कळवण्याचे आवाहन

रत्नागिरी : मेफेड्रोन ड्रग्जचे राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असल्याचे पुढे येत आहे. तसेच त्याचा व्यापार आणि विक्री केली जात असून, याचे वाईट परिणाम समाजावर होत आहेत. याला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेद्वारे मेफेड्रोनचा अमली पदार्थ कायद्यामध्ये समावेश केला असून, सेवन, व्यापार आणि विक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही मेफेड्रोनची विक्री काही समाजविघातक प्रवृत्ती करीत असल्याचा संशय आहे, असे आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.मेफेड्रोन हा एम्फेटामाईन आणि कॅथिनोन वर्गातील नार्कोटीक ड्रग्ज आहे. बाजारात तो ड्रोन एमकॅट, व्हाईट मॅजिक व मँव मँव या नावाने ओळखला जातो. तो टॅबलेट अथवा पावडरच्या स्वरुपात येतो. कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये मेफेड्रोन या पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. २००७ पासून मेफेड्रोन इंटरनेटवर उपलब्ध होते. २००८ मध्ये कायदा व सुव्यवस्था पाहणाऱ्या संस्थांना याची माहिती मिळाली. २०१० च्या सुमारास मेफेड्रोन हा युरोप, इंग्लड या भागात पसरला होता. २००८ मध्ये इस्त्रायलमध्ये सर्वप्रथम यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर स्वीडनने बंदी घातली. २०१० मध्ये सर्व युरोपीयन देशांनी यावर बंदी आणली भारतातही २०१५मध्ये मेफे ड्रोनवर बंदी घालण्यात आली असून, या बंदीचे उल्लंघन करुन सेवन, विक्री केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसानी दिला आहे. (प्रतिनिधी)