शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅसिड रेन’च्या अफवेने लांजात पळापळ

By admin | Updated: April 17, 2015 00:04 IST

प्रशासनाची धावपळ : रेल्वे प्रशासनाच्या अस्वच्छतेचे कारण उघड

लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशनच्या परिसरात ‘केमिकल रेन’ पडल्याची अफवा संपूर्ण लांजात पसरताच प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या अस्वच्छतेमुळेच पडलेल्या पावसाचे पाणी गटारातून वाहात असताना फेसाळले, असा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे.गुरुवारी दुपारी ३ वाजता लांजा तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्याचप्रमाणे विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणीदेखील मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचे पाणी रेल्वे ट्रकच्या शेजारी असणाऱ्या गटारातून वाहत असताना रेल्वे ट्रॅकवर असणारे रसायन या पाण्यात मिसळल्याने संपूर्ण गटाराच्या पाण्यावर फेसाळेला तवंग तयार झाला. अनेकांनी या गटाराच्या पाण्यावरील फोटो काढून व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवले व विलवडे रेल्वे स्टेशन येथे केमिकलचा पाऊस पडल्याची अफवा उठवली. तत्काळ लांजा तहसीलदार दशरथ चौधरी यांनी तलाठ्यांमार्फत पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यावेळी संपूर्ण गावात अशा प्रकारे कुठेच पाऊस पडला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व फक्त रेल्वे स्टेशनच्या गटारापुरताच केमिकलचा पाऊस पडला का? असा सवाल केला. रेल्वे स्टेशन येथे असणारी अस्वच्छता रेल्वे थांबल्यानंतर पडणारे रसायन यामुळे आज पडलेल्या पावसामुळे हे रसायन रेल्वे स्थानकाच्या गटारात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आणि ज्या गटारामध्ये वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यावर पांढरा फेसाळ असा तवंग निर्माण झाला. याचे आश्चर्य येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, आपल्या स्टेशनच्या अस्वच्छतेमुळे असा प्रकार घडल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले. तोपर्यंत शासकीय यंत्रणेने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेच्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी हा प्रयत्न चालू केला आहे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)


रेल्वे ट्रकवरील रसायनयुक्त पाणी गटारातून वाहात आल्याचा फोटो व्हॉटस्अपवरून फिरला आणि अफवा पसरली.
तहसीलदार दशरथ चौधरी यांनीही घेतली घटनास्थळी धाव.
तहसीलदारांनी केला खुलासा.