शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST

अणुस्कुरा घाटात कार चारशे फूट दरीत कोसळली, अपघाती मृत्यूचे गूढ

राजापूर : साखरपुड्याच्या दिवशीच घरातून निघून गेलेल्या लांजा येथील तरुणाच्या गाडीचा अणुस्कुरा घाटात अपघात झाला असून, त्यात तो तरुण जागीच ठार झाला आहे. त्याची कार घाटातून ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. कौस्तुभ विजय कुरूप (३०, लांजा), असे त्याचे नाव आहे. ३ जूनला त्याचा साखरपुडा होणार होता आणि बुधवार, ४ जून रोजी वैदिक परंपरेनुसार त्याचे लग्न होणार होते. मात्र, त्याआधीच त्याचा अपघातीमृत्यू झाल्याने गूढ निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे घाटमार्गे प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्यावर गाडीचे इंजिन पडलेले दिसले. ती माहिती त्याने अणुस्कुरा तपासणी नाक्यावरील पोलिसांना दिली. त्याआधारे तपासणी नाक्यावरील पोलिसांनी घाटात जाऊन पाहणी केली असता एक गाडी दरीत कोसळली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने ही माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली. राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, लांजाचे पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे आपल्या कर्मचाऱ्यांसह अणुस्कुरा घाटात दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही अपघाताचे वृत्त समजताच धावून आले.अपघातग्रस्त गाडीची पुरती चाळण झाली होती आणि त्याच्या बाजूलाच एक तरुण पडला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अधिक माहितीमध्ये तो लांजातील कौस्तुभ कुरूप असल्याचे पुढे आले. तो कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता. मंगळवारी ३ जूनला तो लांजाकडे परत येत असताना अणुस्कुरा घाटात हा अपघात झाला असावा आणि घाटातील धुक्यामुळे हा अपघात कोणाच्याही लक्षात आला नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

कौस्तुभ बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रारदरम्यान, कौस्तुभ बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी प्राजक्ता यांनी मंगळवारी संध्याकाळी लांजा पोलिस स्थानकात नोंदवली आहे.

नोंदणीविवाहानंतर होणार होते विधीपरंपरेनुसार लग्नकौस्तुभ आणि प्राजक्ता यांचे ५ मे २०२५ रोजी रजिस्टर लग्न झाले आहे. मात्र, कौस्तुभच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. यामुळे विधीपरंपरेनुसार मंगळवार, ३ रोजी ते दोघे साखरपुडा करणार होते आणि बुधवार ४ रोजी विवाह करणार होते.

मध्यरात्रीनंतर कोणालाही न सांगता बाहेर पडलामात्र, सोमवारी मध्यरात्रीनंतर कौस्तुभ घरात कोणालाही न सांगता कार घेऊन बाहेर निघून गेला. मंगळवारी साखरपुडा असल्याने प्राजक्ता त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, संपर्क न झाल्यामुळे अखेर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता लांजा पोलिस स्थानकात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची तक्रार लांजा पोलिसांकडे नोंदवली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरितसाखरपुड्याच्या दिवशी कौस्तुभ कोणालाही न सांगता घराबाहेर निघून का गेला, अपघात नेमका कधी झाला, अपघातग्रस्त गाडीचे इंजिन रस्त्यावरच कसे पडले होते, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अपघात कसा आणि कधी झाला, याबाबतही गूढ असून, पोलिस तपासात या गोष्टी उघड होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस