Ratnagiri: दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच केला अत्याचार; संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:50 IST2026-01-19T20:49:54+5:302026-01-19T20:50:06+5:30
मंडणगड (जि. रत्नागिरी ) : तालुक्यातील एका ग्रामीण भागातील दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच अत्याचार केल्याची घटना शनिवारी (१७ ...

Ratnagiri: दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच केला अत्याचार; संशयित ताब्यात
मंडणगड (जि.रत्नागिरी) : तालुक्यातील एका ग्रामीण भागातील दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच अत्याचार केल्याची घटना शनिवारी (१७ जानेवारी) घडली. याप्रकरणी मंडणगड पाेलिसांनी संशयित काकाला रविवारी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली. फिर्यादी, त्यांचा नवरा, सासू व लहान मुलगी हे चौघे मंडणगड एसटी स्टँड येथे बसलेले हाेते. तेव्हा तेथे फिर्यादी यांचा चुलत दीर आला. मुलीस खाऊ देतो, असे सांगून तो मुलीला घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी ताे परत न आल्याने फिर्यादी, सासू व पती मुलीचा शोध घेण्यासाठी गेले. ते मंडणगड नगरपंचायतीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या देशी दारू दुकानाजवळ पाेहाेचले.
या दुकानाच्या बाजूला असलेल्या एका पडक्या खोलीतून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी धाव घेतली असता संशयित अत्याचार करत असल्याचे दिसले. मुलीच्या आई, वडिलांना पाहताच संशयिताने पळ काढला.
या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने मंडणगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली. पाेलिसांनी रविवारी संशयितास ताब्यात घेतले.