Ratnagiri: एसटी बसमधून डिझेलची चोरी, बंदुकीसह चोरट्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:47 IST2026-03-31T16:47:27+5:302026-03-31T16:47:47+5:30

चोरी करत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात सापडला

A thief was arrested for stealing diesel from an ST bus in Dapoli | Ratnagiri: एसटी बसमधून डिझेलची चोरी, बंदुकीसह चोरट्यास अटक

Ratnagiri: एसटी बसमधून डिझेलची चोरी, बंदुकीसह चोरट्यास अटक

दापोली : तालुक्यातील भडवळे शेरी भोईवाडी बसथांबा येथे उभ्या असलेल्या एसटी बसमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला दापोली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतूसही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (२९ मार्च) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली.

गौतम मनोहर रुखे (रा. दयाळ रुखेवाडी, खेड), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद एसटीचे वाहक निवृत्ती सखाराम पवार यांनी दिली आहे. त्यानुसार, त्यांची बस (एमएच २० बीएल १५३५) भडवळे गावी मुक्कामी होती. रात्रीच्या सुमारास गौतम रुखे हा कार (एमएच ०१ डीआर ३४५१) घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून पाइपच्या साहाय्याने डिझेल चोरण्यास सुरुवात केली. चोरी करत असतानाच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता, त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेली एक १२ बोअरची सिंगल नळीची गावठी बनावटीची बंदूक आणि १२ बोअरचे जिवंत काडतूस सापडले. या कारवाईची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तोरसकर आणि पोलिस उपनिरीक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिस हवालदार अभिजित पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पूर्व इतिहास तपासणार

याप्रकरणी बीएनएस कलम ३०५ (बी) (इ) आणि शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ (१-ख) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपीचा कोणताही पूर्व इतिहास आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Web Title : रत्नागिरी: बस से डीजल चोरी, बंदूक के साथ चोर गिरफ्तार

Web Summary : रत्नागिरी के दापोली में एक बस से डीजल चुराते हुए एक चोर को रंगे हाथों पकड़ा गया। पुलिस ने एक अवैध बंदूक और गोला-बारूद जब्त किया। आरोपी गौतम रुखे पर शस्त्र अधिनियम के तहत आरोप लगे हैं। पुलिस उसके आपराधिक इतिहास की जांच कर रही है।

Web Title : Ratnagiri: Diesel Theft from Bus, Thief Arrested with Gun

Web Summary : In Ratnagiri, a thief was caught red-handed stealing diesel from a bus in Dapoli. Police seized an illegal gun and ammunition. The suspect, Gautam Rukhe, faces charges under the Arms Act. Police are investigating his criminal history.