Ratnagiri: बैलाला चुकवताना कार उलटली अन् जळून खाक, लोटे येथील दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:36 IST2026-01-05T17:35:21+5:302026-01-05T17:36:58+5:30
आवाशी : मुंबईहून गाेव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारसमाेर अचानक आडव्या आलेल्या बैलाला चुकवण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या ...

Ratnagiri: बैलाला चुकवताना कार उलटली अन् जळून खाक, लोटे येथील दुर्घटना
आवाशी : मुंबईहून गाेव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारसमाेर अचानक आडव्या आलेल्या बैलाला चुकवण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातानंतर कारने पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. हा अपघात रविवारी (४ जानेवारी) पहाटे ५:३० वाजता मुंबई - गाेवा महामार्गावरील लाेटे (ता. खेड) येथे झाला.
पडवे (ता. गुहागर) येथील खळे कुटुंब आपल्या एका नातेवाईकाला मुंबई येथील विमानतळावर साेडण्यासाठी शनिवारी सकाळी गुहागर येथून गेले होते. काही तांत्रिक कारणामुळे त्यांना विमानतळावर पोहाेचण्यास उशीर झाल्याने त्यांचे विमान चुकले. त्यामुळे ते पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी रात्री पनवेल येथून निघाले हाेते. यावेळी कारमधून एकूण सहा जण प्रवास करत होते. कार खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील एक्सल (तलारी) फाटा येथे आली असता, कारसमोर एक बैल आडवा आला.
या बैलाला चुकवण्याचा प्रयत्न केला असता कार दुभाजकावर आदळून उजव्या बाजूने घासत गेली व थांबली. कार थांबताच सर्वजण कारमधून बाहेर आले. सर्वजण कारमधून उतरताच कारने पेट घेतला. गाडीत सीएनजी किट असल्यामुळे आग भडकली आणि कार पूर्णतः जळून खाक झाली.