शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ६५५ कुटुंबे शौचालयाविना

By admin | Updated: July 9, 2015 23:47 IST

नगर परिषद : सकारात्मक मानसिकता गरजेची

चिपळूण : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत येथील नगर आरोग्य विभागातर्फे शहराचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. घर तेथे शौचालय ही संकल्पना शहरात राबविली जाणार असल्याने मुदत संपूनही या योजनेसाठी अर्ज मागणी होत आहे. आजपर्यंत नगर परिषद आरोग्य विभागाकडे ६५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. घर तेथे शौचालयसाठी राज्य शासनाकडून ८ हजार रुपये, तर केंद्र शासनाकडून ४ हजार रुपये असे १२ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून होती. ज्या व्यक्तीकडे स्वत:च्या मालकीची जागा आहे त्याला शौचालय उभारण्यासाठी हे अनुदान मिळू शकते. आतापर्यंत नगर परिषदेकडे ६५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, यामध्ये काहींच्या घरी शौचालय आहे, त्यांनीही अर्ज दाखल केले असल्याने त्याचा सर्व्हे आरोग्य विभागातर्फे सुरु आहे. प्रभागनिहाय अर्ज पाठविले जाणार असून, मुदत संपूनही अर्जांना अद्याप मागणी आहे. पहिल्या टप्प्यात ३३६ अर्ज सरकारकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित अर्ज टप्प्याटप्प्याने पाठविण्याबाबत आरोग्यविभाग यंत्रणा काम करणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करणे, आवश्यक ती कागदपत्र आहेत की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचा वेळही या कामासाठी जात आहे. मात्र, नागरिकांनी सकारात्मकता मानसिकता दाखवल्यास शहरात स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक शौचालयावर दरवर्षी अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. घर तेथे शौचालय ही संकल्पना प्रत्यक्ष अमलात आल्यास शौचालय देखभाल व दुरुस्तीवर होणारा नगर परिषदेचा खर्चही वाचणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)