शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात ६५ घरांचे पिण्याचे पाणी रोखले

By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST

भातगावमधील प्रकार : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

गुहागर : तालुक्यातील भातगाव धक्का येथील सुमारे ६५ घरांना पाणी पुरवठा होत असलेल्या नदीवर खासगीरित्या बांध घालून पाणीपुरवठा रोखण्यात आला आहे. याप्रकरणी पुरुषोत्तम गणेश करमरकर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी गुहागरच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून सभापती राजेंद्र बेंडल यांनी ग्रामस्थांची तहसीलदारांबरोबर चर्चा घडवून आणली. तहसीलदार पाटील यांनी मंडल अधिकारी वरवडेकर यांना तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भातगाव धक्का येथे ब्राह्मण, मराठा, कुणबी समाजातील सुमारे ६५-७० घरांमधून सुमारे १५० लोकवस्ती आहे. नळपाणी योजेनतील पंप नादुरुस्तीमुळे गावातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून ग्रॅव्हिटीने पाणी घेऊन ग्रामस्थ आपली तहान भागवत होते. गावातील पुरुषोत्तम गणेश करमरकर यांच्या जागेतून वाहणाऱ्या या नदीच्या उंचावरील भागातून करमरकर कुटुंबीय पूर्वापार पाटाचे पाणी उचलत होते. त्यांची पिण्याची गरज भागून नदीत वाहून जाणारे पाणीच सुमारे १५० ग्रामस्थांनी आपल्यासाठी वळवले होते. मात्र, करमरकर यांनी आपल्याला पुरेपूर पाणी मिळत असूनही वाहून जाणाऱ्या पाण्यावर पुन्हा बांध घालून ग्रामस्थांचे पाणी पळवले असल्याचे भातगाव येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.दरम्यान, वैयक्तिक कामासाठी आलेल्या करमरकर यांना तहसीलदार पाटील यांनी बोलावून घेतले. नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोणाचीही मालकी नसल्याचे त्यांनी करमरकर यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदी माझ्याच जमिनीतून जाते, त्यामुळे पाणी माझे आहे, असा अट्टाहास करमरकर यांनी धरल्याचे पुढे आले आहे. मंडल अधिकारी उद्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी करतील. त्यांच्या अहवालानुसारच कार्यवाही होईल. परंतु नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळणारे पाणी कुणालाही खासगीरित्या रोखता येणार नाही, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)