शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला २ लाख रूपयांचा दंड

By admin | Updated: November 7, 2015 22:38 IST

आयोगाचा निकाल : शिक्षकाला माहिती देण्यास टाळाटाळ

रत्नागिरी : कागदपत्रे वेळीच न दिल्याने संबंधीत शिक्षकाला त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल जिल्हा परिषदेने दोन लाख रुपये भरपाई द्यावी. तसेच तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे यांनी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना धमकावल्या प्रकरणी एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दापोली तालुक्यातील शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपली ८ महत्वाची कागदपत्रे पडताळणीसाठी दापोली पंचायत समितीकडे सादर केली होती. त्यामध्ये पदवी प्रमाणपत्रे, डी. एड., जातीचा दाखला, जातपडताळणी दाखला व इतर कागदपत्रांचा त्यामध्ये समावेश होता. पडताळणीनंतर जिल्हा परिषदेने ती कागदपत्रे दापोली पंचायत समितीकडे परत दिली होती. त्यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नंदलाल शिंदे होते. पावरांना त्यांची कागदपत्रं मागणी करुनही मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारात दापोली पंचायत समितीकडून कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांचे केबीनमध्ये याबाबत वाद ेझाला. पावरा आणि शिंदे यांनी परस्परविरोधी तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदवली. पावरा यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले. त्यावेळी राज्य माहिती आयोगाने शिंदे यांनी धमकावल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जानेवारी, २०१५मध्ये दिले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना आदेश देऊनही राज्य माहिती आयोगाला अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे पावरा यांनी पुन्हा राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले होते. त्या दरम्यान, पावरा यांच्यावर सुरीने हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये जिल्हा परिषदेने पावरा यांचे निलंबन केले होते. या निलंबनानंतर त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली होती. याची आयोगासमोर सुनावणी झाली. याप्रकरणी पावरा यांना मनस्ताप झाल्याने नुकसानभरपाई म्हणून २ लाख रुपये देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. (शहर वार्ताहर)