शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘रत्नागिरी गॅस’विरोधात १६ कामगारांचे उपोषण सुरु

By admin | Updated: March 24, 2015 00:11 IST

साखळी आंदोलन : वेतनाचा प्रश्न ऐरणीवर

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सी अ‍ॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सिंग एंटरप्रायझेसमध्ये हे १६ कामगार गेली सहा वर्षे काम करत होते. लेबर अ‍ॅक्टनुसार या कामगारांना वेतन मिळत नसल्याने संबंधित कंत्राटदाराकडे रितसर मागणी करुनही दाद दिली जात नसल्याने अखेर कामगार आयुक्तांकडे धाव घेतली. याचा परिणाम कंपनी प्रशासनावर होऊन अन्य कंत्राटी कामगारांनाही या कायद्याप्रमाणे वेतन देणे भाग पडले. याचा राग मनात धरुन या १६ कामगारांना कंपनीने कंत्राट संपल्यानंतर या कामगारांचे नवीन गेटपास न काढता ‘काही दिवसांनी तुम्हाला बोलावण्यात येईल’, असे सांगितले.या दरम्यान के. डेनियल या नवीन कंत्राटदाराला हे कंत्राट मिळूनही समीर भोसले नामक स्थानिक कंत्राटदाराला फक्त दोनच महिन्याचे कंत्राट देऊन नवीन कामगार भरतीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे या कामगारांमध्ये संताप व्यक्त होऊन अखेर कंपनी गेटसमोर साखळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. या उपोषणासाठी लोकहक्क समिती व अंजनवेल ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. सकाळपासून १६ कामगारांनी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडल्यानंतरही सोमवारी सायंकाळीपर्यंत प्रकल्पातील एकही अधिकारी फिरकला नाही. तहसीलदार वैशाली पाटील व पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी उपोषणस्थळी जाऊन कामगारांशी चर्चा केली.या १६ कामगारांसह लोकहक्क समितीचे यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे, श्रीकांत धामणस्कर, राजेश धामणस्कर यासह २५० ग्रामस्थ सहभागी झाले होते.कामगारांचे साखळी उपोषण होणार हे निश्चित झाल्याने अधिकारी रविशंकर कौल व कंत्राटी विभागाचे प्रमुख पाटील हे अचानकपणे जाणीवपूर्वक रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, कामगारांशी चर्चा केल्यानंतर कंपनीचे असिस्टंट सरव्यवस्थापक रविशंकर कौल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याचे सांगितले.