पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:03 AM2023-05-30T10:03:00+5:302023-05-30T10:03:36+5:30

Rajasthan : इथे पती-पत्नीचं भांडण झालं आणि त्यानंतर पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. त्यानंतर त्याची स्थिती इतकी गंभीर झाली की, त्याचा मृत्यू झाला.

Husband consumed toilet cleaner after wife stopped drinking alcohol in Rajasthan | पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

googlenewsNext

Suicide By Husband: पती-पत्नीच्या भांडणाच्या अनेक घटना समोर येत असतात. पण यातील काही घटना अशा असतात ज्यावर अजिबात विश्वास बसत नाही. काही लोक या भांडणातून असं काही पाउल उचलतात ज्यात त्यांचा जीवही जातो. राजस्थानच्या भरतपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. इथे पती-पत्नीचं भांडण झालं आणि त्यानंतर पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. त्यानंतर त्याची स्थिती इतकी गंभीर झाली की, त्याचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे राहणाऱ्या 48 वर्षीय विनोद जाटवचं त्याच्या पत्नीसोबत भांडण झालं. असं सांगण्यात आलं की, विनोद रोज दारू पित होता. शुक्रवारी याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला. झालं असं की, त्याच्या पत्नीने त्याला दारू पिण्यास मनाई केली. त्यामुळे तो संतापला. त्याने पत्नीला धमकी दिली.

अशातच त्याचा राग आणखी वाढला. त्याने कशाचाही विचार न करता धक्कादायक पाउल उचललं. विनोद रागात बाथरूममध्ये जाऊन टॉयलेट क्लीनर प्यायला. ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली. पत्नी लगेच घरातील इतर लोकांना बोलवलं. त्याच्या पोटात खूप जळजळ होत होती. त्यानंतर त्याला कोल्ड ड्रिंक पाजण्यात आलं. पण त्याला हॉस्पिटल नेल्यावर मृत घोषित करण्यात आलं.

एका दुसऱ्या रिपोर्टनुसा, स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्तीला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि याच कारणाने त्यांचं पत्नीसोबत नेहमी भांडण होत होतं. मृत्यूच्या दिवशी सुद्धा त्यांच्या वाद झाला होता. ज्यानंतर विनोद रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. मृत्यूनंतर त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं.

Web Title: Husband consumed toilet cleaner after wife stopped drinking alcohol in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.