हृदयद्रावक! वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:28 IST2023-07-07T13:27:41+5:302023-07-07T13:28:37+5:30

आपल्या पतीला वाढदिवशी अन्य महिलेसोबत पाहताच पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले.

  His wife ended her life with 2 children after seeing her husband with another woman in Jodhpur, Rajasthan | हृदयद्रावक! वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन

हृदयद्रावक! वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन

जोधपूर : आपल्या पतीला वाढदिवशी अन्य महिलेसोबत पाहताच पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. राजस्थानच्या जोधपूरमधील या हृदयद्रावक घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मृत महिला पतीच्या प्रेयसीसोबत भांडताना दिसत आहे. जोधपूर जिल्ह्यातील मथानिया परिसरातील सुरेश विश्नोई हा जोधपूरच्या रतनदा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. पेशाने टॅक्सी चालक असलेल्या सुरेशच्या एका चुकीच्या पावलाने कुटुंब उद्धवस्त झाले.

दरम्यान, मागील रविवारी सुरेशचा वाढदिवस असल्याने पत्नीने त्याला गावी येण्यास सांगितले. दिवसभर वाट पाहूनही तो घरी न आल्याने पत्नीने त्याला अनेकदा फोन केला. पण सुरेशने फोन न उचलल्याने पत्नी काळजीत पडली. सुरेशसोबत संपर्क न झाल्याने त्याची २५ वर्षीय पत्नी निरमा आपल्या दोन मुलांसह उमेद नगरहून जोधपूरकडे रवाना झाली. 

पतीला दुसऱ्या तरूणीसोबत पाहताच बसला धक्का 
खरं तर ती पतीला वाढदिवशी सरप्राईज देणार होती. सकाळी आठ वाजता ती पती राहत असलेल्या घरी पोहचली अन् दरवाजा ठोठावला. आपली पत्नी आणि मुलांना पाहून सुरेशला धक्का बसला. पण खोलीत पत्नी निरमा गेली असता तिलाही धक्का बसला. कारण खोलीत एक तरूणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. हे दृश्य पाहून निरमा संतापली अन् तिने पतीसह त्याच्या प्रेयसीला खडेबोल सुनावले. याशिवाय तिने या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला.

दोन मुलांसह संपवलं जीवन 
आपला पती अन्य एका तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे समजताच निरमाला अश्रू अनावर झाले. ती पुन्हा मथानियाकडे निघाली. पतीचे हे कृत्य सहन न झाल्याने ती अर्ध्यातूनच बस मधून उतरली. यानंतर निरमा थेट जवळच्या रेल्वे स्थानकावर गेली आणि तिने आपल्या मुलांसह फलोदीहून जोधपूरच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. 

  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title:   His wife ended her life with 2 children after seeing her husband with another woman in Jodhpur, Rajasthan