उद्धव ठाकरे यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट

By राजेश भोस्तेकर | Published: April 1, 2024 04:11 PM2024-04-01T16:11:08+5:302024-04-01T16:12:30+5:30

यावेळी खासदार संजय राऊत आणि मिलींद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

uddhav thackeray met the meenakshi patil family | उद्धव ठाकरे यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट

उद्धव ठाकरे यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी १ एप्रिल रोजी पेझारी येथे पाटील कुटुंबियांची भेट घेतली आणि त्‍यांचे सांत्‍वन केले. यावेळी खासदार संजय राऊत आणि मिलींद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

शेकाप नेत्‍या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. उद्धव ठाकरे यांनी मीनाक्षी पाटील यांच्‍या प्रतिमेला अभिवादन केले. त्‍यांचे बंधू आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव ऍड. आस्‍वाद पाटील यांची भेट घेवून सांत्‍वन केले. यावेळी शिवसेना जिल्‍हाप्रमुख सुरेंद्र म्‍हात्रे, उपजिल्‍हाप्रमुख प्रशांत मिसाळ, अविनाश पाटील, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर यांच्यासह शिवसेना शेकापचे पदाधिकारी तसेच पाटील कुटुंबिय उपस्थित होते.

Web Title: uddhav thackeray met the meenakshi patil family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.