शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना मोबाईल पुरवल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 23:17 IST

काहीच दिवसांपूर्वी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले होते. 

रायगड : अलिबागच्या उपकारागृहतील कैद्यांना मोबाईल पुरवल्या प्रकरणी दोन कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. सुभेदार अनंत भेरे आणि शिपाई सचिन वाडे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. काहीच दिवसांपूर्वी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले होते. 

कोरोनाच्या कालावधीत अलिबागमधील कारागृहात थेट कैद्यांना ठेवण्यात येत नव्हते. यासाठी अलिबाग नगरपालिका शाळेत उप कारागृह उभारण्यात आले होते, अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली होती, त्यानंतर गोस्वामी यांच्या सह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना याच उप कारागृहात ठेवण्यात आले होते, गोस्वामी हे कारागृहातुन समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. 

दरम्यान, कारागृहातील निलंबीत करण्यात आले ल्या कर्मचाऱ्यांचा या प्रकरणी काही संबंध नाही, अशी माहिती अलिबाग कारागृहाचे अधिक्षक ए. टी. पाटील यांनी लोकमतश बोलताना दिली. उप कारागृहातील अन्य कैद्यांना मोबाईल पुरवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, गोस्वामी यांच्या मोबाईल वापराबाबत चौकशी सुरू आहे असेही त्यांनी सांगितले,