ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:40 AM2021-04-22T05:40:19+5:302021-04-22T05:40:19+5:30

वसा सुतारपाडा येथील घटना; अधिक तपास सुरु  

Two minors died when a pile collapsed on them | ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : वसा येथे नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या अंगावर नदीकाठचा मातीचा ढिगारा पडून त्यांचा मृत्यू झाला. विजय सुरेश कोहकेरा (१२) आणि नीरज रमेश कोहकेरा (९) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे.
वसा सुतारपाडा येथील हे दोघे मंगळवारी दुपारी वसा येथून वाहणाऱ्या वेरोली नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. ते व त्यांचे मित्र नदीपात्रात पोहत असतानाच नदीकिनाऱ्याचा दगड-मातीचा काठ नदीपात्रात कोसळला. 
या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली विजय व नीरज दबले गेले. 
सदर घटनेची माहिती मिळताच गावकरी व तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मुलांचा शोध घेतला असता संध्याकाळी दोघांचे मृतदेह सापडले. तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह पाठविण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास तलासरी पोलीस करत आहेत.  तलासरी भागात उन्हाचा पारा वाढला असताना तसेच शाळा बंद असल्याने वसा सुतारपाडा येथील मुले वेरोली नदीत पोहण्यासाठी गेली असताना त्यांच्यावर काळ ओढावला.
गावावर शोककळा  
दोन्ही मुले नदीत पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी हि घटना घडल्याने दोघांचा जीव गेला. या घटनेमुळे गावावर पसरली आहे. 

Web Title: Two minors died when a pile collapsed on them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.