शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हातपाटी वाळू व्यवसाय बंद

By admin | Updated: October 12, 2015 04:52 IST

वर्षभर बंद असलेल्या हातपाटी वाळू व्यवसायाला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र खणीकरणाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या हातपाटी वाळू व्यवसायाला एकच महिन्याची

दासगांव : वर्षभर बंद असलेल्या हातपाटी वाळू व्यवसायाला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र खणीकरणाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या हातपाटी वाळू व्यवसायाला एकच महिन्याची उपसा करण्यास परवानगी मिळाली होती. त्या उपशाची मुदतही शनिवारी (१० आॅक्टोबर) रात्री १२ वाजता संपल्याने वाळू व्यावसायिक व यावर अवलंबून असणारे मजूर तसेच बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला महाड तालुक्यातील सावित्री खाडीतील हातपाटी वाळू व्यवसाय गेले वर्षभर संपूर्णपणे बंद होता. मात्र शासनाचा बुडत असलेला महसूल व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचा विचार करीत अखेर शासनाने हातपाटी वाळू व्यवसायावरून बंदी उठवली व उपसा करण्यास परवानगी दिली. मात्र परवानगीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर परवानगीसाठी लागणाऱ्या या व्यवसायाला संबंधित अनेक कार्यालयांतील परवानग्या (नाहरकत दाखले) दिल्यानंतरच वाळू उपसा करण्यासाठी रीतसर रॉयल्टी उपसा परवाना देण्यात आला. मात्र गौनखणीकरणाचा वर्षाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या वाळू उपशाला फक्त एकच महिन्याची परवानगी मिळाली होती. या परवानगीच्या काळातदेखील गणेशोत्सव आल्यामुळे जवळपास १७ दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने मुदतवाढ करून देण्यात आली होती. मात्र त्याची ही मुदत शनिवारी रात्री संपल्याने हातपाटी वाळू व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अडणीत आले आहेत. हातपाटी वाळू व्यवसायाला शासनाकडून परवानगी असली तरी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या परवानगीसाठी कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत नवीन उपसा परवाना मिळत नाही. नवीन परवान्याच्या नियमानुसार महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड, मुंबई यांनी इन्लॅन्ड व्हसल अ‍ॅक्ट १९१७ नुसार बोटी रजिस्टर करण्यास सांगितल्याने पुन्हा वाळू व्यवसाय अडचणीत आला आहे.वर्षभर बंदीच्या काळात ज्या बांधकाम व्यावसायिकांनी चोरटी वाळू घेऊन बांधकाम पूर्ण केले २४ महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकांना ५० लाख ७६ हजार ८२२ रुपये दंड महाड तहसीलदारांनी ठोठावल्याने सध्या बंद झालेल्या या वाळूमुळे महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले मजूरही हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)