शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल; हॉटेल व्यावसायिकांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:55 IST

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला.

अलिबाग : कोरोनाची भीती अजूनही डोक्यावर असतानाच गेल्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊनचा तणाव घालविण्यासाठी पर्यटकांनी शनिवारपासून आजच्या तिसऱ्या दिवशी रायगडात विक्रमी गर्दी केली आहे. अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या तालुक्यांतील किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले आहेत. पर्यटकांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लॉकडाऊनमुळे ओस पडलेले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, नागाव, मुरूडमधील काशीद, मुरूड, पुढे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटनाच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रसिद्ध असणारे दिवेआगर येथे येण्याची पर्यटकांना उत्सुकता असते. 

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली स्थिती, यामुळे कोकणातल्या पर्यटन उद्योगाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. मात्र, दिवाळीनंतर गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच महिन्यांनंतर हॉटेल व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.कोरोना संकट असल्याने पर्यटकांची संख्या या वेळी कमी झाली आहे. काही मोजक्याच लॉज, रिसॉर्टला दिवाळीत पूर्ण बुकिंग असले तरी अनेक ठिकाणी पर्यटकांच्या बुकिंगसाठी घासाघीस करावी लागत आहे. रूमचे दर ऐकून पुन्हा पर्यटक फोन करीत नाहीत. त्यामुळे रिसॉर्ट, लॉजिंगचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्नही व्यावसायिकांना पडला आहे.

ऐतिहासिक स्थळांवरही वळू लागली पर्यटकांची पावलेरायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या छोट्या व्यावसायिकांनाही दिवाळीत फटका बसला आहे. शासनाने समुद्रकिनारी पर्यटन सुरू केले असले तरी ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तू यांच्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे शिवप्रेमी, ट्रेकिंग, सामाजिक संस्थांनी गड, किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, नुकतीच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गड, किल्ले ऐतिहासिक वास्तू हे कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना खुले केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागू झाल्यामुळे या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला आता चालना मिळणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड