रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 08:23 AM2018-12-31T08:23:09+5:302018-12-31T08:38:07+5:30
रायगडमधील शिवसेना नेते सुरेश कालगुडे यांचे सोमवारी अपघाती निधन झाले आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महाड MIDC जवळ त्यांचा अपघात झाला.
![shiv sena suresh kalgude accident death | रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू shiv sena suresh kalgude accident death | रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/accident_201707252.jpg)
रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू
रायगड - रायगडमधील शिवसेना नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचे सोमवारी अपघाती निधन झाले आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महाड MIDC जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अंगावरुन ट्रेलर गेल्याने कालगुडेंचा मृत्यू झाला आहे. मात्र कालगुडेंचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.