शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 01:01 IST

Raigad News : भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

रायगड : जिल्ह्यातील तब्बल १४ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. शाळांची यादी निश्चित झाल्यानंतर सरकारी, जिल्हा आणि ग्राम स्तरावर अभिसरण करण्यात येणार आहे. भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.मार्च, २०२० रोजी राज्याच्या द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, सरकारने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत, तसेच गरज पडल्यास इयत्ता आठवीचे वर्गही जोडण्याचा सरकारचा विचार आहे.आदर्श शाळाच्या यादीमध्ये अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या वायशेतमधील शाळेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, कर्जत- कळंब, खालापूर-चौक, माणगाव- तळाशेत, म्हसळा-म्हसळा, मुरुड-मझगाव, पेण-आमटेम, पोलादपूर- लोहारे, रोहा-कोलाड, श्रीवर्धन- वडवली, सुधागड-वावोशी, तळा-वाशी हवेली, उरण-जुई, पनवेल- वावेघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे.जिल्ह्यातील १४ शाळांचा समावेश सरकारने आदर्श शाळा योजनेत केला आहे. ही चांगली बाब आहे. आदर्श शाळा करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक साहाय्य, सोईसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यकती मदत करण्यात येईल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRaigadरायगड