शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

रोहा उपजिल्हा रुग्णालयास सुविधा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:39 AM

तातडीने पूर्तता करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश : मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत बैठक

रोहा : रोहा उपजिल्हा रुग्णालयाविषयीच्या रोहेकरांच्या भावना लक्षात घेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मार्चच्या पहिल्या आठवड्यात याबाबत मंत्रालयस्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांची माहिती देऊन बैठकीपूर्वी जे विषय निकालात निघू शकतात त्याची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

रोहेकरांनी विशेषत: युवकांनी पुन्हा एकदा उठाव करत रोहा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हातात घेतला असून याबाबतची बैठक रविवारी विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत रोहा ग्रामीण रुग्णालयाच्या सेवांबाबतच्या सद्य:स्थितीवर चर्चा झाली. रोह्यातील वैद्यकीय सेवा प्रभावित होण्यामागची कारणे पाहताना रोहा उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून आले. तसेच हा ताण क्षमतेबाहेरचा असल्याने रोह्यातील वैद्यकीय व्यावसायिकही सेवा देताना पुरेसा न्याय देत नसल्याची खंत रोहेकरांनी मांडली.यावर बैठकीत चर्चा होऊन रोशन चाफेकर, स्वप्निल धनावडे,अरुण साळुंखे, चेतन कोरपे, समीर दळवी, विक्रम जैन, आशिष शहा, भालचंद्र पवार यांचा एक गट याबाबत पूर्ण माहिती घेऊन त्या आधारावर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता खैरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमवारी पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांना रोशन चाफेकर, स्वप्निल धनावडे, पराग फुकणे, अरुण साळुंखे, चेतन कोरपे आदींनी निवेदन दिले.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लगेचच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याशी संपर्क साधून रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती घेऊन ती भरण्याबाबत काय करता येईल याचा प्रस्ताव करण्यास सांगितले. तसेच रोहा उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंश, विंचुदंश व सर्पदंश यावरील औषधे योग्य त्या प्रमाणात तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयातून पाठवण्याचे आदेश दिले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसतात या प्रश्नी संबंधित एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी डॉक्टर उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच रोहा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिससह अन्य उपकरणे उपलब्ध करण्यासाठी मागील निर्णयाची सद्य:स्थिती कळवण्यास सांगितले. रोह्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या आरोग्य दक्षता समितींचे पुनर्गठण लवकरात लवकर करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मान्य केले.च्रोहा उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने डॉक्टर नाहीत, या कारणास्तव खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचेतरु णांचे म्हणणे आहे.