शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 18:23 IST

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : १७ हेक्टर क्षेत्रावर फेर पुनर्वसन करण्याचे वारंवार आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या तोंडाला जेएनपीएने पुसली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी रविवारीच (८) जुन्या मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी कुटूंबियांसह जेएनपीए प्रशासनाविरोधात आंदोलनाला सुरुवात  केली आहे.   जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत. बंदर उभारण्यापुर्वीच शेवा- कोळीवाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन बोरी-पाखाडी येथे करण्यात आले आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून १७ हेक्टर ऐवजी फक्त दोन हेक्टर जमीनीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवी लागली आहे.वाळवीने पोखरलेली ग्रामस्थांची घरे एकापाठोपाठ एक अशी कोसळली आहेत.हनुमान कोळीवाडा वाळवीने पोखरले गाव अशीच ओळख देशभरात झाली आहे. तेव्हापासुनच शासनाच्या नियमानुसार १७ हेक्टर विकसित जागेतच वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावातील रहिवाशांचे फेर पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी केंद्र,राज्य, जेएनपीए, सिडको, महसूल, पोलिस प्रशासनाशी ग्रामस्थांचा मागील ३५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. 

 

संघर्षानंतर जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.मात्र तांत्रिक कारणे पुढे करून जेएनपीए, सिडको, महसूल विभागाकडून वारंवार फेर पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी अखंडपणे चालढकल करुन ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.त्यामुळे आता भू-संपादन केलेल्या जमिनीचा वापर  केला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी ( ८) मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज रस्त्याची साफसफाई तर उद्यापासून मूळ जागेचा ताबा घेण्यासाठी ग्रामस्थ हल्लाबोल करतील.

जागेचा ताबा मिळेपर्यंत जेएनपीए,शासनाविरोधात सुरू करण्यात आलेला संघर्ष सुरूच राहणार आहे. आता माघार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जेएनपीए प्रशासन भवन,रस्ते व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून १२५ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरण