रायगडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:45 AM2020-07-16T00:45:28+5:302020-07-16T00:45:51+5:30

जिल्ह्यात सर्वात जास्त अलिबागमध्ये १२५ मिमी तर सर्वात कमी खालापूर तालुक्यात ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Rains disrupt life in Raigad | रायगडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

रायगडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

अलिबाग : जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट मिळाल्यानंतर, बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याचा वारा असा मान्सूनचा झंझावात कायम राहिला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर गुरुवारपासून लॉकडाऊन होणार म्हणून खरेदीला बाहेर पडलेल्या नागरिकांना खरेदी करता आली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिक चिंतेत होते. जिल्ह्यात सर्वात जास्त अलिबागमध्ये १२५ मिमी तर सर्वात कमी खालापूर तालुक्यात ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनाºयाजवळील गावे, खाडी किनाºयावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा सोमवारी देण्यात आला होता. तर मंगळवारी पहाटेपासून पडणाºया पावसामुळे नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली होती, तर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत पाऊस कोसळण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. यामुळे सलग तीन दिवस रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी, नदी, खाडी आणि दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ५५.७४ मिमी पाऊस रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५५.७४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तसेच १ जूनपासून १५ जुलै बुधवारपर्यंत एकूण सरासरी ११९४.१९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये अलिबाग १२५.०० मिमी, पेण १७ मिमी, मुरुड ७७ मिमी, पनवेल ३० मिमी, उरण ५७ मिमी, कर्जत ३१.२० मिमी, खालापूर ८ मिमी, माणगांव ५७ मिमी, रोहा ११४.३० मिमी, सुधागड ५८ मिमी, तळा ४४ मिमी, महाड ३३ मिमी, पोलादपूर ७१ मिमी, म्हसळा ६५ मिमी, श्रीवर्धन ८२ मिमी, माथेरान २२.४० मिमी असे आजचे एकूण पर्जन्यमान ८९१.९० मिमी इतके आहे. त्याची सरासरी ५५.७४ मिमी इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ३७.१३ टक्के इतकी आहे.

Web Title: Rains disrupt life in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस