वाहनाच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: December 22, 2016 06:16 IST2016-12-22T06:16:04+5:302016-12-22T06:16:04+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास वहूर गावचे हद्दीत असलेल्या मस्त मालवणी हॉटेलच्या

One killed in the crash | वाहनाच्या धडकेत एक ठार

वाहनाच्या धडकेत एक ठार

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास वहूर गावचे हद्दीत असलेल्या मस्त मालवणी हॉटेलच्या वेटरला अज्ञात वाहनाची धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. हा वेटर नैसर्गिक विधीसाठी महामार्गालगत गेला असताना ही घटना घडली.
वहूर गावचे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या मस्त मालवणी हॉटेलचा वेटर राजू कोंडवे (३०, रा. ताम्हाणे, पोलादपूर) हे बुधवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास मुंंबई-गोवा महामार्गालगत नैसर्गिक विधीसाठी गेले असता त्याला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसली. या धडकेत राजू कोंडवे याचा जागीच मृत्यू झाला. चालक फरार असून या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in the crash