शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या १३ मंडळांना नगर परिषदेच्या नोटीसा

By admin | Updated: September 19, 2015 23:56 IST

उच्च न्यायालयाने रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई केली असतानाही अनेक मंडळानी अनधिकृत कमानी उभारून तसेच बॅनरबाजी करून शहर

- वैभव गायकर,  पनवेलउच्च न्यायालयाने रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई केली असतानाही अनेक मंडळानी अनधिकृत कमानी उभारून तसेच बॅनरबाजी करून शहर विद्रूपीकरण करण्यास सुरुवात केली आहे. पनवेल नगर परिषदेने शहरातील १३ मंडळांना शहर विद्रूपीकरण कायद्यांतर्गत नोटिसा पाठवून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी एका दिवसात हटविण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल शहरातील रस्ते अरुंद असल्याने उत्सवकाळात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. उत्सवकाळात मोठमोठ्या कमानी उभारून सार्वजनिक मंडळांकडून राजकीय संघटना अथवा बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती केल्या जातात. मात्र या कमानी उभारताना स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतल्या जात नाहीत. याउलट कमानी उभारताना रस्त्यांच्या मध्ये खड्डे खोदले जातात. उत्सव संपल्यानंतर अशा रस्त्यांची डागडजी स्थानिक प्रशासनाला करावी लागते. अनधिकृतपणे कमानी उभारणाऱ्या मंडळाना पनवेल नगर परिषदेने शनिवार नोटिसा पाठवून एका दिवसात या कमानी हटविण्याचे आदेश दिले आहेत. या १३ मंडळामध्ये अभीनव मित्रमंडळ पायोनियर , पनवेल शहर शिवसेना शाखा लाईन अली , गणेश मित्र मंडळ टपाल नाका , जय महाकाळी मित्रमंडळ ठाणा नाका रोड ,साई बाबा मित्रमंडळ उरण नाका , साई स्रध्दा मित्रमंडळ बंदर रोड , रोज बजार मित्रमंडळ आंबेडकर रोड , गंठण व कोनल पटेल ज्वेलर्स एमजे रोड, मल्हार मित्रमंडळ मिडलक्लास सोसायटी , ओमकार मित्रमंडळ प्रभु अली , सांस्कृतिक मित्रमंडळ मिडलकलास सोसायटी , युवा जागृती आणि सांस्कृतिक सामाजिक मंडळ रोहिदास वाडा , स्वराज्य मित्र मंडळ मिरची गल्ली मंडळाचा समावेश आहे . पनवेल नगर परिषद हद्दीत नगर परिषदेने नोटीसा धाडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सिडको नोडमध्ये उभारलेल्या अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. खारघर, कामोठे, कळंबोळीमध्येही अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना कमानी उभारण्यात आली आहे. सिडकोचे अनधिकृत नियत्रंक विभाग यावर कारवाई करीत असते. मात्र गणेशोत्सव सुरू होऊनही अशाप्रकारचे शहरांचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण सुरूच आहे. पनवेल नगर परिषद हद्दीतील १३ मंडळांना आम्ही शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत नोटिसा रोजी बजावल्या आहेत . उभारलेल्या अनधिकृत कमानी हटविण्यासाठी मंडळांना एक दिवसाचा काळावधी दिला आहे. या कमानी मंडळानी स्वत: हटविल्या नाहीत तर नगर परिषद विशेष मोहीम राबवून या कमानी हटवेल व अशा मंडळांवर गुन्हे दाखल करेल . - चारुशीला पंडित,अतिरिक्त मुख्याधिकारी, पनवेल नगर परिषद.