शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महायुती तुटल्यानेच राष्ट्रवादीची बाऊंड्री

By admin | Updated: October 27, 2014 00:39 IST

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत. अन्यथा तेही आले नसते व मनसे, काँग्रेस, सपाप्रमाणेच राष्ट्रवादीही ठाणे जिल्ह्यातून तडीपार झाली असती.या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १८ जागांपैकी सात भाजपाला, सहा शिवसेनेला, चार राष्ट्रवादीला आणि एक अपक्षाला अशा जागा प्राप्त झाल्या आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. त्यांना ८१९७४ मते मिळालीत. आणि भाजपा व शिवसेना यांच्या उमेदवारांना १३३९१ व सनेच्या उमेदवाराला ३७२५९ अशी मते मिळालीत. हा एकच मतदारासंघ असा आहे की जिथे सेना-भाजपाच्या उमेदवारां पडलेल्या मतदानापेक्षा राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराला पडलेली मते दुपटीहून अधिक आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप हे निवडणूक लढवित होते. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला ४६४०५ तर सेनेच्या उमेदवाराला ६७७१९ अशी मते पडलीत. तर राष्ट्रवादीच्या संदीप नाईक ७६४४४ अशी मते मिळालीत. सेना, भाजपाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर ती संदीप नाईक यांच्या मतांपेक्षा दुपटीहून अधिक होते. असेच शहापुरात घडले तिथे राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांना ५६८१३ मते पडलीत. पण सेनेच्या उमेदवारला ५१२६९, भाजपाच्या उमेदवाराला १८२४६ मते पडलीत या दोघांचीही मते बरोरांपेक्षा खूप जास्त होतात. उल्हासनगरातही असेच चित्र आहे. तेथून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींना ४३७६० मते पडलीत. परंतु, भाजपाच्या उमेदवाराला ४१८९७ सेनेच्या उमेदवाराला २३८६८ मते मिळालीत. दोघांच्या मतांची बेरीज ही खूपच अधिक होते. याचा अर्थ या वेळी सेना, भाजपा स्वतंत्र लढले म्हणून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला किमान चारजागी तरी यश मिळाले, हे स्पष्ट होते. (विशेष प्रतिनिधी)