BREAKING: महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशालीटी कंपनीमध्ये भीषण आग, कारखाना जळून खाक; परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:30 IST2023-02-08T12:27:30+5:302023-02-08T12:30:09+5:30

आग लागलेला कारखाना पाच मजली आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर स्फोट झाला आणि आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

Massive fire at Mallak Specialty Company in Mahad MIDC raigad | BREAKING: महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशालीटी कंपनीमध्ये भीषण आग, कारखाना जळून खाक; परिसरात घबराट

BREAKING: महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशालीटी कंपनीमध्ये भीषण आग, कारखाना जळून खाक; परिसरात घबराट

अलिबाग-

महाड औद्योगिक क्षेत्रातील मल्लक स्पेशालिटी कारखान्यात भीषण आग लागली आहे. कारखान्यातील ईओ प्लांटला आग लागली असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेला कारखाना पाच मजली आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर स्फोट झाला आणि आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

आग लागली त्यावेळी चार कामगार मजल्यावर उपस्थित होते. त्यातील एक कामगार बाहेर पडला असून इतर तीन कामगार अजूनही आत असल्याची माहिती समोर आली आहे. छोटे छोटे स्फोट होत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. या घटनेनं परिसरात घबरात निर्माण झाली असून आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Read in English

Web Title: Massive fire at Mallak Specialty Company in Mahad MIDC raigad

टॅग्स :Raigadरायगड