शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव काळ नदीचे पाणी दूषित

By admin | Updated: April 28, 2017 00:20 IST

माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे.

माणगाव : माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे माणगांव नगरपंचायत जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी माणगावमधील ग्रामस्थांनी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन गुरु वारी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार व सहकाऱ्यांनी दिले आहे.माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळ नदीत सोडले आहे. या काळ नदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना काळ नदीतील पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने माणगाव काळ नदीतील दूषित पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा दाखला दिला होता. याकडे नगरपंचायत डोळेझाक करीत आहेत. या समस्येची रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार, भाजपाचे बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, खांदाड पोलीस पाटील नथुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते अकबर परदेशी आदींसह समिती प्रशासन अधिकारी, माणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी पाहणी करून नगरपंचायत प्रशासनावर व बिल्डर्स मालकांवर तीव्र संताप व्यक्त केला.या गहन समस्येबाबत माणगावकर ग्रामस्थांनी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत माहितीकरिता माणगाव प्रांताधिकारी, माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व नगरपंचायत माणगाव यांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)