शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपी शेकापचा कार्यकर्ता

By admin | Updated: July 28, 2015 23:56 IST

तालुक्यातील नारलेवाडी येथील राजू फार्ममध्ये पकडलेले दहा टन रक्तचंदन तस्करीप्रकरणी मुंबई चेंबूर येथील अकबर हुसेन आणि समीमखान हुसेखान पठाण यांचा शोध रायगड

कर्जत : तालुक्यातील नारलेवाडी येथील राजू फार्ममध्ये पकडलेले दहा टन रक्तचंदन तस्करीप्रकरणी मुंबई चेंबूर येथील अकबर हुसेन आणि समीमखान हुसेखान पठाण यांचा शोध रायगड पोलीस घेत आहेत. त्यातील फार्म हाऊसचा मालक असलेला अकबर हुसेन हा अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्तार् असून त्याची पत्नी शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. रक्तचंदन कंटेनरमध्ये अकबर हुसेन याच्या देखरेखीखाली भरले जात होते. गुजरात पाठोपाठ आता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे.कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र ्रप्रदेश या राज्यात प्रामुख्याने चंदनाची झाडे आहेत. तेथील रक्तचंदनाची तस्करी करून तो माल जेएनपीटी बंदरातून राज्यात विविध भागात वाहतूक करून नेला जात असल्याचा संशय आहे. कर्जत -मुरबाड रस्त्याने ही तस्करी होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. त्याच रस्त्यावर साळोख गावाच्या हद्दीत नारळेवाडी भागात मुंबईच्या चेंबूर भागातील उद्योजक अकबर हुसेन उर्फ राजूभाई यांचा राजू फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसमध्ये साठवून ठेवलेले रक्तचंदन चोरून आणलेल्या कंटेनरमध्ये भरले जात असताना पोलिसांनी वन विभागाच्या मदतीने धाड टाकली होती. तेथे पोलिसांनी पकडलेल्या रशीदखान पठाण याने फार्महाऊसमध्ये साठा करून ठेवलेले रक्तचंदन कंटेनरमध्ये भरताना फार्म हाऊसचे मालक अकबर हुसेन आणि त्यांचा मित्र शब्बीरखान पठाण असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजू फार्मची तपासणी केली असता तेथे अकबर हुसेन यांचा एक बॅनर मिळाला. काही आक्षेपार्ह वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. रक्तचंदन साठा फार जुना असल्याचा अंदाज वन अधिकारी आर. बी. घाडगे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)