शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : अलिबागमध्ये शेकापचे शक्तिप्रदर्शन, सुभाष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 02:33 IST

विधानसभा मतदार संघातून शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अलिबाग : विधानसभा मतदार संघातून शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकापसाठी अलिबागची जागा अतिशय महत्वाची असल्याने शेकापने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या माध्यमातून विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न शेकापने केल्याचे बोलले जाते.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची आघाडी झालेली आहे. काही ठिकाणी काँग्रेस या आघाडीचा भाग आहे, परंतु अलिबागमध्ये काँग्रेसकडून माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा मुलगा राजा ठाकूर हे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेनेकडून महेंद्र दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे हे सुध्दा रेसमध्ये आहेत. भाजपाचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनीही तयारी केली आहे. अद्याप युतीबाबत कोणतीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजपानेही बरोबरीने उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे निवडणूकीमध्ये चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे.अलिबाग हा शेकापचा बाले किल्ला आहे. गेल्या पाच वर्षात शेकापने काय केले? असे प्रश्न सोशल मिडीयावर उपस्थित केले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे. उमटे धरणातून ६२ गावांना होणारा अशुध्द पाणी पुरवठा हा मुद्दा शेकापसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने याच मुद्द्याचा वापर निवडणूक प्रचारात अस्त्र म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.शेकाप अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण मतदार संघाच्या जागा लढवणार आहे, तर श्रीवर्धन आणि कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर महाडची जागा काँग्रेस लढणार आहे. अलिबागची जागा शेकापसाठी प्रतिष्ठेची बनली असल्याने त्यांनी मतदार संघात बांधणीला सुरुवात केली आहे.सोमवारी शेकापकडून आमदार सुभाष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने शेकापच्या समर्थकांनी शेतकरी भवन समोर गर्दी केली होती. याप्रसंगी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, आस्वाद पाटील, प्रदीप नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aligarh-pcअलीगढ