शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Vidhan Sabha 2019: पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा उमेदवाराचा शोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:00 PM

चर्चेचे गुऱ्हाळ सुरु; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

पनवेल : विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अद्याप पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापला उमेदवार मिळत नसल्याने शेकापसह आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकीकडे भाजपने निवडणुकीच्या अनुषंगाने मास्टर प्लॅन आखायला सुरु वात केली असताना अद्याप विरोधी पक्षात उमेदवाराचा थांगपत्ता नसल्याने शेकापला पनवेलमध्ये उमेदवार मिळतो की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकीकडे उरण विधानसभा मतदारसंघात शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विवेक पाटील यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या प्रचारार्थ बैठकांना देखील सुरु वात झाली आहे. मात्र अद्याप पनवेलचे चित्र स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पनवेल विधानसभा मतदारसंघातून पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, प्रीतम म्हात्रेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याने शेकापसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. शेकापची उमेदवारी घेण्यासाठी पक्षातून कोणताही नेता उत्सुक नसल्याचे समजते. एकेकाळी पनवेल विधानसभा हा शेकापचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, वाढत्या शहरीकरणाचा फटका मोठ्या प्रमाणात शेकापला बसला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीची प्रचिती शेकापला आली. पहिल्यांदाच शेकापला शहरी भागात सपाटून मार खावा लागला. शेकापचे तळ्यात मळ्यात असताना रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांना देखील पक्षाच्या मार्फत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना अद्याप भाजपला टक्कर देण्याचे सोडा साधा उमेदवार देखील जाहीर करण्यात आला नसल्याने आघाडीचे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. शेकापने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अन्यथा आम्ही आमचा विचार करायला मोकळे आहोत अशी चर्चा काँग्रेसच्या एका गोटात सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019