Raigad Crime News: अलिबागमध्ये एक संतापजनक घटना घडली. एका तरुणीचा तिच्याच बॉयफ्रेंडने हातोड्याने हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास तो तरुणीला मंदिराच्या परिसरात मारहाण करत होता. यात ती तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अलिबागमधील कनकेश्वर मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी सांयकाळी घडली असून, प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर समोर आले.
तरुणीवर हल्ला का केला?
सूरज बुरांडे (वय २८) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो अलिबागमधीलच वरसोलपाडा थेरॉड बाजारपेठेत राहतो. शुक्रवारी सायंकाळी सूरज आणि त्याची गर्लफ्रेंड कनकेश्वर मंदिर परिसरात भेटले. तिथे ते बराच वेळ गप्पा मारत होते. दरम्यान, गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलांसोबतही बोलते त्यामुळे दुसऱ्या मुलासोबतही तिचे प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता.
कनकेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या एका झाडाखाली ते बसले होते. त्यांच्या बोलणं सुरू असतानाच सूरजने तिला तू दुसऱ्या मुलांशी का बोलते म्हणून मारले. तू मोबाईलवरून कोणाशी बोलत असते? असे विचारताच त्यांच्यात वाद सुरू झाला.
दोघांमधील भांडण वाढले आणि सूरजने बॅगेत आणलेला हातोडा काढला. त्यानंतर त्याने हातोड्याने गर्लफ्रेंडच्या डोक्यात आणि कपाळावर मारले. ती जखमी झाली. त्यानंतर तो तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने तिला दगडाने मारहाण केली.
सूरजने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. सध्याची तिची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या प्रकरणी सूरज बुरांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटकही करण्यात आली आहे.
Web Summary : In Alibaug, a man attacked his girlfriend with a hammer near Kankeshwar temple, suspecting infidelity. He beat her for three hours, causing serious injuries. The accused, Suraj Burande, has been arrested.
Web Summary : अलीबाग में एक व्यक्ति ने कंकणेश्वर मंदिर के पास अपनी गर्लफ्रेंड पर हथौड़े से हमला किया, उसे बेवफाई का शक था। उसने उसे तीन घंटे तक पीटा, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई। आरोपी सूरज बुरांडे को गिरफ्तार कर लिया गया है।