शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यू कंपनीकडून जीवितास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:38 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांची पोलीस संरक्षणाची मागणी


लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवनाची केलेली कत्तल आणि खाडीमध्ये अवैध भरावाबाबतची तक्रार भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांनी केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी वन प्रशासनाने स्थळपाहणी अहवालाची प्रक्रिया राबवली होती, परंतु स्थानिकांनी ती कंपनीच्या इशाऱ्यावर उधळून लावली होती. या प्रकरणात कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासाकडून जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.
संरक्षित असणाºया कांदळवनांची कत्तल करुन तसेच खाडीमध्ये बेकायदा भराव करुन जेएसडब्ल्यू कंपनी कायदा धाब्यावर बसवत आहे. याबाबत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अ‍ॅड.मोहिते यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वनसंरक्षक यांच्याकडे केली होती. त्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी वनविभागाने स्थळपाहणी करण्याचे ठरवले होते. पंचनाम्यासाठी संबंधिताना नोटीस देण्यात आली होती. जागेवर पोहोचल्यानंतर सुमारे ८० नागरिक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कंपनीच्या सांगण्यावरूनच त्यांनी स्थळपाहणी करण्याचे रोखले. माझे सहकारी परशुराम म्हात्रे, अनंता पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील यांना धमकवण्यास सुरुवात केल्याचे अ‍ॅड.मोहिते यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.
जमाव मोठा असल्याने वडखळ पोलीस ठाण्यातील एक पोलीस वन विभागाचे अधिकारी, खारभूमी विभागाचे अधिकारी हतबल झाले होते.
संबंधित कंपनीने षडयंत्र रचून स्थळपाहणीच्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. कंपनीने केलेली कृत्य बाहेर काढत असल्याने, माझ्या जीवितास सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासनाकडून धोका निर्माण झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष असल्याने रात्री-अपरात्री बाहेर जावे लागते. संबंधितांकडून माझ्याबाबत घातपात होण्याची शक्यता असल्याने, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे, तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


खारबंदिस्थीच्या सुरू असणाºया कामाबाबत कंपनीचा कसलाही संबंध नाही. स्थळपाहणी उधळून लावणारे हे स्थानिक होते. या प्रकरणात कंपनीला गोवण्यात येत आहे. आमच्या कंपनीचे मालक आणि कंपनी प्रशासन यांचे नाव उगाचच बदनाम करण्यात येत असल्याने सदरचे आरोप धादांत खोटे आहेत. -नारायण बोलबुंडा (जनसंपर्क प्रमुख, जेएसडब्ल्यू)