शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

दासगाव आरोग्य केंद्राला गळती

By admin | Updated: July 23, 2015 04:07 IST

महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दुरुस्तीचे

सिकंदर अनवारे , दासगावमहाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दुरुस्तीचे काम करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. संपूर्ण इमारत गळत असल्याने आरोग्य केंद्रात पाणी साचले आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावात जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. महामार्गावर होणारे अपघात तसेच आपत्कालीन स्थितीत हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास २२ गावे आणि ३९ वाड्यांमधील ग्रामस्थांना उपचारांकरिता दासगावचे आरोग्य केंद्रच आधार ठरत आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्राप्रमाणेच ठेकेदारांचे कुरण बनले आहे. २०१० पासून आजतागायत या केंद्रावर अनेक दुरुस्तीची कामे झाली. २०१० मध्ये ७ लाख ७६ हजार ४११ रुपये तर २०१४ मध्ये ४ लाख ७५ हजार २८८ रुपये, २ लाख ५४ हजार ५०३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये डॉक्टर राहत असलेल्या निवासांची दुरुस्ती, छतावर पत्रे, दरवाजे बदलणे, स्वच्छतागृह, प्रसूतीगृह, नवजात शिशु कक्ष बांधण्यात आले. नवीन ४ क्वार्टर देखील बांधण्यात आले आहेत. स्थानिक ठेकेदाराने हे काम करताना कोणत्याही प्रकारची गुणवत्ता कायम ठेवली नाही. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने इमारतीला गळती लागली आहे. डॉक्टरांच्या निवासांची देखील अशीच स्थिती आहे. बांधलेले प्रसूतीगृह निकृष्ट असल्याने ते बंद ठेवण्यात आल्याने महिलांचे हाल होत आहेत.