अपघात विभागात सोयी-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:50 AM2020-02-19T01:50:19+5:302020-02-19T01:50:35+5:30

जिल्हा सरकारी रु ग्णालय : परिसरात अस्वच्छता, रु ग्णांची गैरसोय

Lack of facilities in the accident department | अपघात विभागात सोयी-सुविधांचा अभाव

अपघात विभागात सोयी-सुविधांचा अभाव

Next

निखिल म्हात्रे 

अलिबाग : अपघात विभागात रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी कमकुवत असलेली यंत्रणा, उपचारानंतर हात धुण्यासाठी नसलेले वॉशबेसिन त्याचप्रमाणे अपघात विभागात कुठल्याच फोनला नसलेले नेटवर्कअशा एक ना अनेक कारणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रु ग्णालय समस्यांच्या गर्तेत असताना आता याची झळ अपघात विभागालाही बसली आहे. अपघात विभागही अत्याधुनिक सेवांपासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. महिला रु ग्ण असल्यास त्यांच्यासाठी या अपघात विभागात विशेष सुविधा केली नसल्याने त्यांना सर्वांना एकाच ठिकाणी उपचार करावे लागत आहेत. तर दुसरीकडे या अपघात विभागात कुठल्याच फोनला नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यासाठी रुग्णालय परिसरामध्ये यावे लागत आहे. फोन न लागण्याचा मनस्ताप हा रुग्णांच्या नातेवाइकांसह डॉक्टरांनाही होत आहे.
अलिबाग येथील रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील कानाकोपºयातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात. रुग्णालयामध्ये सोयी-सुविधा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये महामार्ग, कोकण रेल्वे, विविध कंपन्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडतच असतात. तातडीने रुग्णांची तपासणी करण्यासाठी २४ तास अपघात विभाग कार्यरत असतो. मात्र, याच ठिकाणी सोयी-सुविधांची वानवा असल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा रु ग्णालयाच्या आवारात गटाराच्या अर्धवट तुटलेल्या टाक्या, समोरच पडलेला कचारा हा थेट अपघात विभागाच्या समोरील भागातच असल्याने याची दुर्गंधी थेट अपघात विभागात पसरत आहे. येथे येणाºया वासानेच ड्युटीवर असलेले डॉक्टर्स व कर्मचारी हैराण झाले आहेत.

1कोेट्यवधी रु पये खर्च करून जिल्हा सामान्य रु ग्णालयाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सध्या या रु ग्णालयाची अवस्था पाहता कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. इमारतीच्या अपघात विभागात छताचे पाणी अक्षरश: गळत आहे. येथे अपघात झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार होतात.

2अशा गलिच्छ अवस्थेत सध्या रु ग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघात विभागात रु ग्णांवर उपचार करून झाल्यावर डॉक्टर्सना हात धुण्यासाठी अवश्यक असलेले वॉश बेसिन नाही, तसेच टॉयलेटची व्यवस्थाही नाही. अशा दुरवस्थेमुळे सध्या अपघात विभागात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स, नर्स व शिपाई या सर्व कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

सध्याचा अपघात विभाग तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे. सखी केंद्राच्या ठिकाणी लवकरच १० बेडचा अपघात विभाग उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील.
- डॉ. प्रमोद गवई,
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
 

Web Title: Lack of facilities in the accident department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड