‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ग्रीटिंग कार्डची वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:14 AM2020-02-14T00:14:36+5:302020-02-14T00:14:53+5:30

गिफ्ट शॉपी गुलाबी आणि लाल वस्तूंनी सजलेली असताना, सोशल मीडियाच्या जमान्यातही ग्रीटिंग कार्ड आपले अस्तित्व टिकवून आहे.

Increased demand for greeting cards for 'Valentine's Day' | ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ग्रीटिंग कार्डची वाढली मागणी

‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ग्रीटिंग कार्डची वाढली मागणी

Next

अलिबाग : व्हॅलेंटाइन डे हा केवळ महाविद्यालयीन तरु ण आणि युवा पिढीपुरताच मर्यादित राहिला नाही. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठांनी आता व्हॅलेंटाइनचा आधार घेतला आहे. दुकानात दिसणाऱ्या विविधरंगी ग्रीटिंगपासून भेटवस्तूपर्यंत व्हॅलेंटाइन विशेष वस्तूंनी मध्यमवयीन नागरिक आणि अगदी आजी, आजोबांनाही भुरळ घातली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीन जोडपीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ग्रीटिंग कार्डचा आधार घेत आहेत.


गिफ्ट शॉपी गुलाबी आणि लाल वस्तूंनी सजलेली असताना, सोशल मीडियाच्या जमान्यातही ग्रीटिंग कार्ड आपले अस्तित्व टिकवून आहे. या ग्रीटिंगचे आकर्षण तरु ण पिढीपेक्षा मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक आहे, असे दुकानदारांकडून सांगितले जात आहे. युवा पिढी प्रपोज करण्यासाठी ग्रीटिंग कार्डचा अधिक वापर करते तर त्यापुढची पिढी प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी ग्रीटिंगचा आधार घेताना दिसत आहे.
मोठ्या दुकानांमध्ये पर्सनलाइज्ड किचेनपासून टीशर्टपर्यंत तसेच फोटोफ्रेम यांची मागणी अधिक असते. अनेकदा मध्यमवयीन नागरिक आपल्या जोडीदारासाठी लहानसे गिफ्ट निवडून महाविद्यालयीन काळात न केलेल्या मजेचा आनंद घेतात.


युवा पिढी सातत्याने एकमेकांसाठी भेटवस्तूंची खरेदी करीत असली. तरी यानिमित्ताने हटके काही खरेदी करण्याकडे त्यांचा कल आहे.

यंदा दुकानांमध्ये सोनेरी रंगाचे गुलाब खास व्हॅलेंटाइन डेला भेटवस्तू म्हणून दिसत आहेत. त्याशिवाय हृदयाच्या आकाराच्या मेणबत्त्याही हा सण अधिक संस्मरणीय करण्यासाठी विक्र ीला उपलब्ध आहेत.
खºया गुलाबाची किंमत ८० रु पये डझनपासून पुढे आहे. यात लाल रंगाच्या गुलाबांची किंमत व्हॅलेंटाइनच्या दिवशी आणखी वाढेल, असेही विक्रे ते सांगतात. तर पिवळ्या आणि अबोली रंगाचे गुलाब १० रु पयांपर्यंत मिळत आहेत.
व्हॅलेंटाइनसाठी बुके बनवणाºया दुकानांमध्येही वेगाने कामे सुरू आहेत. खास व्हॅलेंटाइनसाठी वेगळे बुके नसले तरी बुकेमध्ये लाल गुलाबांचा समावेश, हृदयाच्या आकाराचे बुके यांची मागणी अधिक होते, अशी माहिती बुके विक्रेत्यांनी दिली.

Web Title: Increased demand for greeting cards for 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.