खांडपे येथे आरोग्य तपासणी शिबिर

By Admin | Updated: December 24, 2016 03:14 IST2016-12-24T03:14:42+5:302016-12-24T03:14:42+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड हॉस्पिटल, रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने

Health check up camp at Khandpe | खांडपे येथे आरोग्य तपासणी शिबिर

खांडपे येथे आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड हॉस्पिटल, रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाचशे जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
खांडपे येथील गीता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुधाकर घारे, मधुकर घारे, पांडुरंग चौधरी, जगदीश देशमुख, प्रमोद देशमुख, तुळशीराम घारे आदी उपस्थित होते. रायगड हॉस्पिटलचे डॉ. ज्योतिप्रकाश पाणी, डॉ. सारिका तोडमल व आदी सहकाऱ्यांनी आरोग्य तपासणी
केली.
खांडपे परिसरातील आरोग्याची समस्या लक्षात घेऊन, या भागासाठी दर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी रायगड हॉस्पिटलचे डॉक्टर्स मोफत तपासणी करतील, तसेच या भागासाठी रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी मोफत बससेवा देण्यात येईल. या परिसरातील रुग्णांना रायगड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल व तपासणी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात येईल, असे या वेळी आयोजकांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Health check up camp at Khandpe