गोविंदा सज्ज

By Admin | Updated: September 5, 2015 23:05 IST2015-09-05T23:05:24+5:302015-09-05T23:05:24+5:30

जिल्ह्यात यंदा एकूण ८ हजार ५८७ दहीहंड्या उभारण्यात येणार असून त्यात २ हजार २३३ सार्वजनिक तर ६ हजार ३५४ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी

Govinda ready | गोविंदा सज्ज

गोविंदा सज्ज

अलिबाग : जिल्ह्यात यंदा एकूण ८ हजार ५८७ दहीहंड्या उभारण्यात येणार असून त्यात २ हजार २३३ सार्वजनिक तर ६ हजार ३५४ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील गोविंदा सज्ज झाले आहेत.
दहिहंडी उत्सावात जिल्ह्यात कोठेही अनूचित प्रकार घडू नये, या करिता जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याकरिता शीघ्र कृती दलाची कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. कृष्णजन्माष्टमीच्या निमीत्ताने जिल्ह्यातील विविध श्रीकृष्ण मढात पांरपरिक कृष्णजन्म सोहोळ््याचे आयोजन करण्यात आले असून ४८ ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

निजामपूरमधील योगेश निजामकर उपसरपंच यांच्यावतीने ७७ हजार ७७७ रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. कर्जतमधील वसंतशेठ भोईर मित्रमंडळ यांच्यावतीने पोलीस मैदान कर्जत येथे ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. मुद्रे खुर्द येथील सागर गोविंद मित्रमंडळाच्या वतीने फायर ब्रिगेड कर्जत येथे ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी कामगार पक्ष व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांच्या वतीने साजरा होणारा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आला आहे.

महाड येथील लोकविकास सामाजिक संस्थेच्या वतीने १ लाख २५ हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. रोह्यात अवधूत तटकरे मित्रमंडळाच्यावतीने डॉ.सी.डी.० देशमुख सभागृहासमोरील मैदानात एक लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे.

खोपोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने एक लाख रुपयांची दहीहंडी शास्त्रीनगर येथे उभारण्यात येणार आहे. बोर्लीपंचतन येथील प्रमोद तुकाराम विचारे चिजवादेवी ट्रस्टच्यावतीने बोर्लीपंचतन एसटी स्टँडमध्ये एक लाख रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे.

Web Title: Govinda ready