पनवेल रेल्वे स्टेशनवर लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; GRPच्या तत्परतेने सुखरूप सुटका

By वैभव गायकर | Updated: April 20, 2026 10:40 IST2026-04-20T10:39:26+5:302026-04-20T10:40:09+5:30

सोमवारी सकाळी ९च्या सुमारास चार प्रवासी लिफ्टमधून प्लॅटफॉर्मवर जात होते.

Four passengers stuck in lift at Panvel railway station for half an hour; Safely rescued by GRP | पनवेल रेल्वे स्टेशनवर लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; GRPच्या तत्परतेने सुखरूप सुटका

पनवेल रेल्वे स्टेशनवर लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; GRPच्या तत्परतेने सुखरूप सुटका

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेलरेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्लॅटफॉर्मवरील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार प्रवासी तब्बल अर्धा तास अडकून पडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९च्या सुमारास चार प्रवासी लिफ्टमधून प्लॅटफॉर्मवर जात होते. अचानक तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्येच बंद पडली. दरवाजे लॉक झाले आणि आत हवा खेळती राहिली नाही. गुदमरल्यासारखे झाल्याने प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.लिफ्टमध्ये प्रवासी अडकल्याचे कळताच कर्तव्यावरील रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ लिफ्ट टेक्निशियनला बोलावून घेतले. सुमारे ३० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर लिफ्टचे दरवाजे मॅन्युअली उघडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.पनवेल हे हार्बर मार्गावरील सर्वात व्यस्त जंक्शन असून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अशा महत्त्वाच्या स्थानकावरील लिफ्ट बंद पडणे गंभीर बाब आहे.

Web Title : पनवेल स्टेशन: लिफ्ट में फंसे चार यात्री, आधे घंटे बाद बचाए गए

Web Summary : तकनीकी खराबी के कारण पनवेल रेलवे स्टेशन की लिफ्ट में चार यात्री आधे घंटे तक फंसे रहे। रेलवे पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उन्हें सुरक्षित बचा लिया, जिससे एक संभावित आपदा टल गई। इस घटना से व्यस्त स्टेशन पर यात्रियों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।

Web Title : Panvel Station: Four Passengers Trapped in Lift, Rescued After Half-Hour

Web Summary : Four passengers were trapped in a Panvel railway station lift for half an hour due to a technical malfunction. Railway police promptly rescued them, averting a potential disaster. The incident raised concerns about passenger safety at the busy station.