शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात; ५ ठार, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 6:49 AM

Five vehicles collide on Mumbai-Pune expressway : हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात  झाला आहे.

ठळक मुद्देया अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे.

खोपोली (प्रतिनिधी) - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३६ जवळ हॉटेल फूड मॉल समोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत.

हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात  झाला आहे. चार मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. वैभव झुंजारे हे त्यांच्या खासगी कारने ते नवी मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यात त्यांची आई, पत्नी व मुलीचा मृत्यू झाला आहे.

झुंजारे हे सोलापूर येथील गावी कुटुंबाला घेऊन येण्यासाठी गेले होते. कोरोना काळात त्यांच्यावरही कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना गावी ठेवले होते.  

अपघातातील मृतांची नावे...१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम,२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,यांचा समावेश आहे.

या अपघातात जमखी झालेल्यांची नावे...

१) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (जखमी)२) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, (जखमी)३) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, (जखमी)४) किशन चौधरी, (गंभीर जखमी)५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी) हे जखमी झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे