कशेळेत सहा कुपोषित बालके दाखल

By Admin | Updated: December 22, 2016 06:16 IST2016-12-22T06:16:46+5:302016-12-22T06:16:46+5:30

कुपोषणाबाबत जिल्हा परिषदेत १६ डिसेंबर रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत

Filing of six malnourished children in the field | कशेळेत सहा कुपोषित बालके दाखल

कशेळेत सहा कुपोषित बालके दाखल

नेरळ : कुपोषणाबाबत जिल्हा परिषदेत १६ डिसेंबर रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील उदासीन अधिकारी वर्गाला कडक शब्दात समज दिली होती. त्यानंतर सोमवार, १९ डिसेंबरपर्यंत सहा कुपोषित बालके कशेळे बाल उपचार केंद्रात दाखल करण्यात आली.
कर्जत आणि कशेळे येथे दाखल तीव्र कुपोषित बालकांशिवाय कोणत्याही उपचाराविना असलेली १७ बालके यांना तत्काळ बाल उपचार केंद्रात दाखल करण्याचे आदेश महिला बालविकासचे तालुका प्रकल्प अधिकारी गहाणे यांना दिले आहेत. कशेळे येथे ६ डिसेंबरला बाल उपचार केंद्रात मालेगाव येथील आकाश पुजाडा या तीव्र कुपोषित बालकाला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन बालके आली असता कशेळे ग्रामीण रु ग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी येथे सोयी नाहीत असे सांगून पिटाळून लावले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तक्र ार दिशा केंद्राचे समन्वयक अशोक जंगले यांनी जिल्हा परिषदेकडे केली. त्यामुळे १७ डिसेंबरपासून हे केंद्र सुस्थितीत करून बाल उपचार केंद्र प्रत्यक्षात आले. दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने बाल उपचार केंद्रातून आदिवासी पालक रोजगार बुडत असल्याने अर्धवट उपचार करून निघून गेल्याची घटना घडली होती. कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या बाल उपचार केंद्रात मोहिनी दगडू जाधव, नवनाथ दशरथ वळवी, छकुली दशरथ वळवी, मुक्ता वसंत तुपे, हर्षदा गणेश गायकवाड, जय वसंत मुकणे, रूतीक जगदीश नार्वेकर ही तीव्र कुपोषित बालके उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Filing of six malnourished children in the field