शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीने वहिवाट अडवल्याने शेतकरी संतप्त; चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या आधीचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:54 IST

उरण तालुक्यातील मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणा-या वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता एका खासगी कंपनीने बंद केला आहे.

अलिबाग : उरण तालुक्यातील मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणाºया वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता एका खासगी कंपनीने बंद केला आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाच्या पूर्वीपासून वापरात होता. वनविभागाच्या हद्दीत जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. या कंपनीने वनविभागाचीही वाट अडवली आहे. या विरोधात ग्रामस्थ कमालीचे संतप्त असून या प्रकरणी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत मंगळवारी स्थळपाहणी करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शेतक-यांच्या मागणीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.

मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली गावांतील शेतक-यांच्या वडिलोपार्जित भातशेती या परिसरात आहे. भातशेतीत जाण्यासाठी तसेच डोंगरावर गुरे चरायला नेण्यासाठी कित्येक वर्षापासून हाच वहिवाटीचा मार्ग आहे. याच रस्त्याचा वापर डोंगरात राहणारे आदिवासी बांधव करतात. त्यामुळे हा सार्वजनिक रहदारीचा रस्ता आहे. याच रस्त्याच्या बाजूला एका लॉजिस्टिक पार्कची जागा आहे. त्याच्या जागेचा आणि रस्त्याचा काहीएक संबंध येत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याआधीही याच कंपनीवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.

वहिवाटीचा रस्ता बंद केल्यामुळे शेतकºयांबरोबरच डोंगरावर गुरे चरायला नेणा-यांची गैरसोय होत आहेत. मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली गावातल्या शेतक-यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चिरनेरच्या जंगल सत्याग्रहापूर्वीपासून आमच्या वडिलोपार्जित वहिवाटीचा हा रस्ता आहे. वनविभागासह आमच्याही जमिनीवर काहींचा डोळा असल्याने परंपरागत वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. जिल्हा प्रशासनाने न्याय दिला नाही तर आंदोलन करावे लागेल, असे मोठी जुई येथील ग्रामस्थ नारायण पांडुरंग पाटील यांनी सांगितले.उसाची शेती बिबट्यांना पोषकजिल्हा प्रशासनाचे चिटणीस विशाल दौंडकर यांनी शेतक-यांची बाजू ऐकून घेत, उरणच्या तहसीलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे शेतक-यांचे वकील अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले. शेतक-यांच्या परंपरागत वहिवाटीचा रस्ता अडवण्याचा कोणत्याही व्यक्ती अथवा कंपनीला अधिकार नाही. कायदेशीरदृष्ट्या संबंधितांना रस्ता मोकळा करून द्यावाच लागेल, असेही अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतक-यांच्या तक्रारीत एका लॉजिस्टिक कंपनीने त्यांच्या परंपरागत वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचे नमूद केले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार मंगळवारी स्थळपाहणी करण्यात येणार आहे. शेतकºयांचा परंपरागत रस्ता बंद केला असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- कल्पना गोडे, तहसीलदार, उरण