शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या मदतीने कोरोनाचे निर्मूलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:28 IST

आदिती तटकरे : श्रीवर्धनमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीवर्धन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून कोरोना विषाणूचा समर्थपणे सामना करत, त्याचे निर्मूलन करण्याचे आपले ध्येय असल्याचे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. 


राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेत शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला, कोरोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून विविध गटांची निर्मिती करून सर्वत्र सर्वेक्षण करणार आहोत. घरात आजारी असलेल्या प्रत्येक व्यक्ती, त्याच सोबत त्या व्यक्तीच्या आजाराविषयी योग्य ती माहिती त्याच्याकडून संकलित करून, त्या व्यक्तीस आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करून, त्यास तत्काळ वैद्यकीय सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत. कोरोनाचे लक्षण असणारे व्यक्ती, कोरोनाबाधित मात्र लक्षणे नसणारी व्यक्ती या सर्वांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात केलीे.   


आजाराने बाधित झाल्याने अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. हा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सदरची मोहीम अतिशय महत्त्वाचे आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. प्रशासनाने निर्माण केलेली टीम एका दिवसात किमान ५० व्यक्तींची चाचणी दिवसभरात करणार आहे. त्यानुसार, सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिक्षक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, नगरपालिका कर्मचारी या सर्वांची या मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. जनतेने या सर्व घटकांना सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी  असे आवाहन तटकरे यांनी केले. 
दरम्यान, तटकरे यांनी भोस्ते, श्रीवर्धन शहरातील कसबा, मोहल्ला या भागात फिरून गृहभेट देत व्यक्तींचे तापमान मोजणे, त्यांच्या हाताला सॅनिटायझर लावणे, मास्क लावण्याविषयी सूचना केल्या.  श्रीवर्धन नगरपरिषदेचे प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी उपस्थित होते. 
आज श्रीवर्धन शहरातील विविध भागांतील घरांमध्ये जाऊन लोकांना कोरोनाविषयी सजग केले आहे. गृह भेटीदरम्यान संबंधित घरांतील व्यक्तींचे कोरोनाविषयीची लक्षणे, विचार, त्यांची कृतिशीलता या सर्व बाबी जाणून घेतल्या आहेत. माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेणे, त्याचे निराकरण करणे हे माझे दायित्व आहे. 
     -आदिती तटकरे, 
पालकमंत्री रायगड