टॅबमुळे दप्तराचे ओझे होणार कमी

By Admin | Updated: December 22, 2016 06:17 IST2016-12-22T06:17:17+5:302016-12-22T06:17:17+5:30

नवीन शैक्षणिक धोरण व आर.टी.ई.नुसार व शासनाच्या जी.आर.प्रमाणे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी वजनाचे असणे

Due to the tab, there will be a burden of Daphara | टॅबमुळे दप्तराचे ओझे होणार कमी

टॅबमुळे दप्तराचे ओझे होणार कमी

म्हसळा : नवीन शैक्षणिक धोरण व आर.टी.ई.नुसार व शासनाच्या जी.आर.प्रमाणे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी वजनाचे असणे अत्यावश्यक असून टॅबच्या माध्यमातून ते निश्चितपणे कमी होईल, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल, विद्यार्थ्यांमध्ये शोध चिकित्सक वृत्ती व जिज्ञासा तयार होईल, अशी आशा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त के ली.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते म्हसळा तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व टॅबचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. त्यामध्ये विशेष करून तळवडे हायस्कूलमध्ये टॅब, तोराडी बंडवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन आणि पाष्टी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आदी कामांचा समावेश आहे. तालुक्यातील तळवडे शाळेत २१ विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. तसेच तोराडी- बंडवाडी रस्त्याचे भूमिपूजन तर पाष्टी येथील अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी श्रीवर्धन मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा प्रमुख रवी मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात पंचवीस हजार टॅब वाटप कार्यक्र म सुरू आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्यासाठी पाच हजार टॅब वाटप करावयाचे आहेत. या टॅबमध्ये ८ वी ते १० वीपर्यंत सर्व अभ्यासक्र म तसेच जगभरातील सर्व माहितीचा समावेश आहे. तसेच इंग्रजीच्या परिपूर्ण डिक्शनरीचा समावेश टॅबमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Due to the tab, there will be a burden of Daphara