शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपद्ग्रस्त ५५ कुटुंबांची सरकारकडून १३ वर्षे अवहेलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 02:46 IST

महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील दरडग्रस्त गावांत अतिवृष्टीमुळे २००५मध्ये भूस्खलन झाले होते.

- जयंत धुळप अलिबाग : महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील दरडग्रस्त गावांत अतिवृष्टीमुळे २००५मध्ये भूस्खलन झाले होते. या वेळी अनेक ग्रामस्थ मृत्युमुखी पडले, तर काही बेपत्ता झाले, अनेकांची राहती घरे दरडीखाली गाडली गेली होती. पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन गावांतही भूस्खलन झाले होते. कोंढवी गावात २९ तर कोतवाल खुर्द गावात २६ कुटुंबे अशी एकूण ५५ कुटुंबे या वेळी बेघर झाली होती. या कुटुंबांची राज्य सरकारकडून तब्बल १३ वर्षे अवहेलना सुरू असून त्यांना अद्याप हक्काचे घर मिळाले नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या हाती आले आहे.नैसर्गिक आपत्तीनंतर रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे आणि जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे तत्कालीन प्रमुख निवासी उप जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आर्थिक साहाय्य आणि मदतीचे आवाहन केले. त्यास देशातील अनेक संस्था, कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्या वेळी मुंबईतील प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक न्यासाने सहकार्याचा मोठा हात पुढे केला. पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन गावांत प्रत्येकी १५ अशी एकूण ३० घरे अवघ्या दीड महिन्यांत बांधून दिली.कोंढवी गावात २९ आपद्ग्रस्त कुटुंबांकरिता १५ आणि कोतवाल खु. गावातील २६ आपद्ग्रस्त कुटुंबांकरिता १५ अशी घरे बांधल्यावर कोणत्या १५ आपद्ग्रस्तांना घर द्यायची, असा प्रश्न या उभय गावांमध्ये निर्माण झाला. त्या वेळी तत्कालीन महाड उप विभागीय महसूल अधिकाऱ्यांनी कोंढवी गावाकरिता लॉटरी पद्धतीने १५ कुटुंबांची निवड केली. निवडलेल्या १५ आपद्ग्रस्त कुटुंबांपैकी पाच कुटुंबे प्रारंभी त्या नव्या घरात राहायला गेली. मात्र, कालांतराने ती पुन्हा आपल्या मूळ गावात आली. सद्यस्थितीत गंगाराम काळू यादव हे एकमेव त्या १५ घरांपैकी एका घरात राहत असल्याची माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली. म्हणजे उर्वरित २९ घरे १३ वर्षे विनावापर पडून आहेत आणि २८ आपद्ग्रस्त कुटुंबे आजही धोक्याच्या छायेतील कोंढवी गावातच राहत आहेत. कोतवाल खु. गावातही अशीच परिस्थिती आहे. २००५च्या अतिवृष्टी आणि भूस्खलन नैसर्गिक आपत्तीमधील पात्र आपद्ग्रस्त कुटुंबे २६ आहेत आणि श्री सिद्धिविनायक न्यासाच्या सहकार्याने बांधण्यात आलेली नवी घरे १५ आहेत. येथे देखील लॉटरी काढण्यात आली मात्र, सर्वांना एकाच वेळी घरे द्या, अशी मागणी करून आपद्ग्रस्त २६ पैकी २५ कुटुंबे नव्या घरात स्थलांतरित झाली नाहीत. केवळ रामाजी ढेबे हे एकमेव नव्या घरात राहत आहेत.>जमीन देणारे शेतकरीही मोबदल्याच्या प्रतीक्षेत१३ वर्षांत दोन्ही गावांतील ५५ कुटुंबांची सरकारच्या निष्क्रियतेमुळे अवहेलना सुरू आहे. श्री सिद्धिविनायक न्यासाने केवळ लाखो रुपये खर्चून बांधून दिलेली घरे विनावापर पडून राहिल्याने आता घरांचीही वाताहात झाली आहे.त्याचबरोबर २००५ मध्ये ही ३० घरे बांधण्याकरिता सरकारी जमीन उपलब्ध नसल्याने कोंढवी गावातील दोन, तर कोतवाल गावातील चार शेतकºयांनी आपली कसती भातशेती अत्यल्प दराने सरकारला दिली.परंतु या सहा शेतकºयांना त्यांच्या जमिनीचे सरकारी दराने मिळणारे अपेक्षित पैसे अद्याप मिळाले नसल्याचे कोतवाल खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश शिंदे यांनी सांगितले.पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खु. या दोन्ही गावांना आजही भूस्खलनाचा धोका आहे. कोंढवी गावची ६८०, तर कोतवाल खु. गावची ७५९ लोकसंख्या असून, ग्रामस्थांनी स्थलांतरित होणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. मात्र, या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे. तीव्र भूस्खलन धोकाग्रस्त कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन्ही गावांत प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून, संबंधित अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.- शिवाजी जाधव, तहसीलदार, पोलादपूर