शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीच्या प्रस्तावांना विलंब

By admin | Updated: September 25, 2014 23:48 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संपूर्ण जिल्ह्यात धडक प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन करण्यात येत आहे.

जयंत धुळप, अलिबागविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संपूर्ण जिल्ह्यात धडक प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तडीपारीपात्र १४० गुंडांच्या प्रस्तावांवर संबंधित उप विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडून निर्णय प्राप्त झाल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिली. जिल्ह्यात समाजात घातक अशा तब्बल १४० गुंडांच्या तडीपारी प्रस्तावांवर गेल्या पाच वर्षांत सुनावणी झालेली नाही. हे गुंड जिल्ह्यात मोकाट फिरत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून निर्णय न घेण्यात आल्याने रायगड पोलीस त्यांच्यावर कारवाई करु शकत नाहीत.नुकताच एका गुंडाबाबतचा तडीपारी प्रस्ताव जिल्हा प्रशासनास रायगड पोलिसांनी पाठविला आहे. त्यामुळे आता तडीपारीपात्र गुंडांची संख्या १४१ झाली आहे.गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १४० तडीपारी प्रस्तावांवर एकदाही जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली नाही. या निर्णयाअभावी रायगड पोलीस गेल्या पाच वर्षांपासून तडीपारीस पात्र १४० गुंडांवर कोणतीही कारवाई करु शकले नाहीत. त्यामुळे या गुंडांकडून परिसरात, विशेषत: निवडणुकीच्या काळात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात दाखल झालेल्या ‘सामाजिक बहिष्काराच्या’ गुन्ह्यामध्ये या तडीपार गुंडांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.या १४० प्रलंबित आणि एक नव्या अशा १४१ तडीपारी प्रस्तावातील संबंधित धोकादायक व्यक्तींना तत्काळ समन्स बजावून त्यांच्या प्रस्तावांच्या सुनावणीची प्रक्रिया सुरु करण्यात यावी असे आदेश जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा देण्यात आले असल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली. हा तडीपार प्रस्ताव सुनावणीची प्रक्रिया आता सुरु करुन विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यावर अंतिम निर्णय होईलच असे सांगता येत नाही परंतु या सुनावणीच्या निमित्ताने त्यांना समज देणे शक्य होईल असे बागल यांनी अखेरीस सांगितले.