शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने लसीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:22 IST

महाड तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ : दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी रांग 

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या भीतीने महाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये धाव घेताना दिसून येत आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना विनालस परत जावे लागत आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात करोनाने हाहाकार माजवला आहे. दर दिवस हा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सुरवातीला लसीकरणाबाबत कोणीही गांभीर्याने विचार केला नाही. मात्र जसजशी करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत गेली तशी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने, महाड तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.सध्या महाड तालुक्यात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. येणारी लस ही एक तासात संपून जात असल्याचे चित्र दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहावयास मिळत आहे. लशींचे शंभर डोस असताना सकाळी ७ वाजल्या पासूनच दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शेकडो लोकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. डॉक्टरांच्या समोर लस किती जणांना द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या लसीकरणामध्ये शंभर डोस असताना जवळपास तिनशे लोकांची रांग लागली होती. प्रत्येक जण आपल्याला कशा प्रकारे लस मिळेल या प्रयत्नात होता. लसीकरणासाठी महाड तालुक्यातून आणि शहरातून मोठ्या संख्येने नागरिक आल्याचे दिसून आले.अलिबाग कार्यालयात संपर्क साधला असता सध्या लस उपलबध नाही स्टॉक शून्य आहे. आज महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लसीची गरज आहे. करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आशा परस्थितीत महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.  जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच जास्तच जास्त लसीचा साठा महाड तालुक्याला उपलबध करून देणे तेवढेच गरजेचे आहे.दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २२ गावांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या केंद्रावर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग सक्षम आहे. नेटवर्कचा ही अडथळा येत नाही, लसीकरण वेगाने केले जाते त्यामुळे तालुक्यातील बहुतेक गावातील नागरिक लसीकरणासाठी दासगव प्राथमिक आरोग्य केंद्रावर येतात. महाड शहरातील नागरिकदेखील लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र दर वेळी लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेकडो नागरिकांना परत जावे लागते. सुरुवातीपासून आतापर्यंत दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर १३५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले असले तरी जवळपास ३०००हून जास्त नागरिक या केंद्रावरून लस न घेता परत गेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने या केंद्राचा विचार करत मोठ्या प्रमाणात लस उपलबध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस