शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसीकरणासाठी प्रौढांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:27 IST

आठ दिवसांत १० हजारांपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद

- निखिल म्हात्रेअलिबाग: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा चैथ्या टप्पा उलटला आहे. त्यात गेल्या आठ दिवसांत सुमारे १० हजारांपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यात ४५ वर्षांवरील २३ हजार ९५७ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, तर ३५ हजार ६७० हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण झाले. यामध्येही ज्येष्ठच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.लसीकरणासाठी जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. पहिला टप्पा संथगतीने झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात लसीकरणाला गती आली आहे. एका दिवसाला सरासरी आता ४ हजारांवर लसीकरण होत आहे. दरम्यान, सर्वच केंद्रांवर ज्येष्ठांची संख्या अधिक दिसली.जिल्ह्यात एकूण ८४ लसीकरण केंद्र असून, त्यापैकी ५९ लसीकरण केंद्र सुरु आहेत, तर २५ केंद्र लसीच्या कमतरतेमुळे बंद आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार १०९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर ३ हजार ७८० डोस शिल्लक आहेत.जिल्ह्यात लसीकरणाचा चौथा टप्पा गतीने सुरू आहे. केंद्रात योग्य प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. अजून लागणाऱ्या कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त होणार आहेत. महिनाभरात चौथा टप्पा पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे. सर्वच केंद्रांवर आता प्रतिसाद चांगला मिळत आहे.- डाॅ. सुहास माने. (जिल्हा शल्य चिकीत्सक)ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद शहरांपेक्षा ग्रामीण भागात लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८ एप्रिलपर्यंत २५९३५ इतक्या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला, तर शहरी भागात हेच प्रमाण कमी असल्याचे चित्र दिसतेे.ग्रामीण भागामध्ये कोविशिल्ड लसीकरणाबाबत जनजागृती झाली असून, नागरिक आता स्वतःहून लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस