शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:15 IST

Raigad News : या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली.

मुरुड : तालुक्यातील विहूर धरणातून मजगाव,उसरोली, नांदगाव, विहूर अशा चार ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सुमारे ३६ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. एकमेव व अतिशय महत्त्वाचे असे धरण आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या पाण्यामुळे असंख्य ग्रामस्थ त्रस्त झाले होते.या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.वेंगुर्लेकर उपस्थित होते.यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी विहूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना पाठवून परिस्थितीचे अवलोकन करावे, विहूर धरणातून दुर्गंधीयुक्त पाणी येते का याचा तपास करावा, या समस्या कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी नवीन अंदाज पत्रक बनवून आवश्यक त्याबाबी पूर्ण करून घ्याव्यात, पुन्हा अशी समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील यांनी विहूर धरणातून मुख्य पुरवठा करणारी वाहिनी लोखंडी टाकण्यात  आली आहे. याशिवाय ज्या पाइपलाइनमधून धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो, तिथे कचरा अडकू नये, यासाठी जाळी बसवणे आवश्यक होते, परंतु असे न केल्यामुळे पाइपलाइनमध्ये कचरा अडकून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. दोन वॉश आउट घेऊनही पाणी तसेच येत आहे. या ग्रामपंचायतींना पाण्याचा कोणताही स्रोत नाही. यासाठी विहूर धरणाची समस्या सोडवून द्यावी, अशी विनंती केली. उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले.   जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील, सदस्य अमित कोळी, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अस्लम हलडे, सदस्य भाई सुर्वे, रमेश दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

उपायाची मागणी  उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. एकमेव हेच धरण चार ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारे आहे, तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले. या समस्येकडे ल देण्याची मागणी केली आहे. 

पाणीसमस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत असणार आहे. ग्रामपंचायतीमधील लोकांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद आपल्यासोबत आहे.-योगिता पारधी, अध्यक्षा, जिल्हा परिषद  

टॅग्स :Raigadरायगड