शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकात्मतेसाठी सलग १००० तास गायनाचा उपक्रम खारघरमध्ये आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:35 IST

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद

-वैभव गायकर

पनवेल : राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘स्टॉप ग्लोबल वार्मिंग’, ‘कैपस विथ हेल्मेट’, ‘सेव्ह वॉटर’, ‘रक्तदान’ या ज्वलंत सामाजिक विषयांच्या प्रचारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये हा उपक्रम साकारला जात आहे. सलग गायनाच्या चीनच्या ७९२ तासांचा विक्रम मोडीत काढून भारताच्या नावावर १००० तासांचा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड हा नवा विक्रम साकारण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमात देशभरातील विविध कानाकोपऱ्यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी होत आहेत. ७ रोजीपर्यंत सुमारे ५५० तास सलग गायनाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ओरिसा, पुणे, गुजरात, राजस्थान आदीसह वेगवेगळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमात ११०० पेक्षा जास्त गायक सहभागी होणार असून मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचा संगीतगीतांचा सहभाग आहे.

गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्रमाची नोंद चीनच्या नावावर आहे. या विक्रमाला मागे टाकण्यासंदर्भात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी चार कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक ठेवण्यात आलेले आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे भारताच्या नावावर विक्रमाची नोंद होणार आहे.

उपक्रमांतर्गत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘स्टॉप ग्लोबल वार्मिंग’, ‘कैपस विथ हेल्मेट’, ‘सेव्ह वॉटर’, ‘रक्तदान’ यासंदर्भातही जनजागृती केली जात आहे, त्यानुसार मंचावर या विषयावरील जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत. या उपक्रमाचे आयोजक विराग मधुमालती यांच्या नावावर आजतागायत सुमारे चार जागतिक विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हे विक्रम राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भेट देत आहेत.सुमो ५५० तासांच्या गायनाचा टप्पा पूर्ण

७ डिसेंबरपर्यंत सुमारे ५५० तास सलग गायनाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ओरिसा, पुणे, गुजरात, राजस्थान आदीसह वेगवेगळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. आतापर्यंत ६५० पेक्षा जास्त गायकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :Raigadरायगड